ETV Bharat / state

Maharashtra Politics: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना विरोध करणे पडले महागात, राष्ट्रवादीच्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी - राष्ट्रवादीच्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

खासदारकीचे वाद राष्ट्रवादीच्या प्रदेश युवक अध्यक्षाला महागात पडले आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेचा विरोध करत काँग्रेस भवन येथे जाऊन आमदार रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांचा एकत्रित असलेला फोटो लावला होता. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सोलापूर दौरा सुरू असताना माध्यमांना चुकीची माहिती देणे, राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षकांना फोन करून वादावादी केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी प्रशांत बाबर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Maharashtra Politics
प्रशांत बाबर, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
author img

By

Published : Feb 12, 2023, 9:57 AM IST

सोलापूर : प्रशांत बाबर यांनी देखील सोशल मीडियावर माहिती प्रसारित करत, स्वतःचे म्हणणे सादर केले आहे. शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षकांना प्रोटोकॉल माहिती नाही. माझी हकालपट्टी करण्याचा शहर अध्यक्षना काहीही अधिकार नाही, असे प्रशांत बाबर यांनी सांगितले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी आगामी सोलापूर लोकसभेला निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करताच सोलापुरातील राजकिय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांत संतापाची लाट : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी करताच काँग्रेसमधील नेत्यांनी याचा विरोध केला. यावरून सोलापूर शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. शुक्रवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, कोण रोहित पवार, ते अजून मॅच्युअर नाहीत. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांत संतापाची लाट पसरली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन येथे जाऊन आमदार रोहित पवार व आमदार प्रणिती शिंदे यांचा एकत्रित असलेला फोटो लावत, आमदार प्रणिती शिंदे यांना रोहित पवार कोण आहेत? हे आठवण करून देण्याचा प्रयत्न केला होता.

अधिकृत परिपत्रक काढून हकालपट्टी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बाबर हे गुरुवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन जयंत पाटील माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी जाणार होते. यावेळी प्रशांत बाबर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुशीलकुमार शिंदेच्या घरी जाऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांसमोर केली होती. तसेच माध्यमांना चुकीची माहिती दिली, असे भारत जाधव (शहर अध्यक्ष,एनसीपी) यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीच्या फेसबुक पेजवर चुकीचे पोस्ट टाकून शहर पक्ष निरीक्षकाबाबत संभ्रम निर्माण केला, अशी कारणे समोर करत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी अधिकृत परिपत्रक काढले. प्रशांत बाबर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केले.

प्रशांत बाबर यांची प्रतिक्रिया : माझी हकालपट्टी करण्याचा शहराध्यक्ष भारत जाधव यांना कोणताही अधिकार नाही. मी पक्षाच्या हितासाठी कायम लढणारा माणूस आहे. गेल्या वीस वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहेत. शरद पवार आणि पवार कुटुंबावर माझी नितांत श्रद्धा आहे आणि राहणार. पवार कुटुंबावर जो कोणी बोलेल त्याला आम्ही कायम विरोध करणार. सोलापूर शहर राष्ट्रवादीतील काही मंडळी वैयक्तिक स्वार्थासाठी प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभुल करत आहेत. मी गेल्या वीस वर्षापासून पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि राहणार, असे प्रशांत बाबर म्हणाले.

हेही वाचा : Eknath Shinde Meet Girish Bapat : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली गिरीश बापटांची भेट, पुष्पगुच्छ देऊन केली तब्येतीची विचारपूस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.