ETV Bharat / state

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजयुमोचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

author img

By

Published : Mar 21, 2021, 11:01 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, आज भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज सायंकाळी सोलापूरमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, भाजयुमोच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

भाजयुमोचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सोलापूर- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, आज भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान आज सायंकाळी सोलापूरमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, भाजयुमोच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणाी

गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटींच्या वसुलीचे टारगेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. हा आरोप गंभीर असून, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, व या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तसेच मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.