सातारा - जिल्हाधिकारी ग्रामपंचायत विभाग सातारा येथे चालू असलेल्या अपिलमध्ये आमच्या सारखी साक्ष दे नाहीतर तुला जीवे मारेन, अशी धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील प्रभाकर खाडे, असे आरोपीचे नाव आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बद्दल अधिक माहिती अशी, की पळशी येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्या राजीनामा बाबत खोटी कागदपत्रे देऊन राजीनामा घेतला. असे अपिल जिल्हाधिकारी ग्रामपंचायत विभाग सातारा येथे चालू आहे. आरोपी सुनील खाडे यांनी उपसरपंच बबन ढोले यांना आमच्या सारखी साक्ष दे, नाहीतर तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. याप्रकरणी बबन ढोले यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याचा आधिक तपास हवालदार खाडे करत आहेत.