ETV Bharat / state

लाॅकडाऊन: चोरांचा मोर्चा आता दारूकडे; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडले

author img

By

Published : Apr 5, 2020, 3:39 PM IST

छुप्या पद्धतीने मिळेल त्या दराने मद्यपी दारू घेण्यास तयार आहेत. त्यामुळे चोरट्यांचे लक्ष आता दारू साठ्यावर आहे. अशातच चोरट्यांनी एक लाख 41 हजार 480 रुपयांच्या देशी-विदेशी दारूवर डल्ला मारला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बंद असलेले कार्यालय फोडून त्यातील दारूसाठा चोरट्यांनी जप्त केला आहे.

liquor-theft-in-satara-during-lockdawn
liquor-theft-in-satara-during-lockdawn

सातारा- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे तळीरामांची गैरसोय होत आहे. छुप्या पद्धतीने मिळेल त्या दराने मद्यपी दारू घेण्यास तयार आहेत. त्यामुळे चोरट्यांचे लक्ष आता दारू साठ्यावर आहे. अशातच चोरट्यांनी एक लाख 41 हजार 480 रुपयांच्या देशी-विदेशी दारूवर डल्ला मारला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बंद असलेले कार्यालय फोडून त्यातील दारूसाठा चोरट्यांनी जप्त केला आहे.

हेही वाचा- #Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाईचे कामकाज अनेक वर्षांपासून बसस्थानकासमोरील कार्यालयातून सुरू होते. 2018मध्ये ते सातारा येथे मुख्य कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. तत्पूर्वी या विभागाच्यावतीने वाई, पाचगणी व महाबळेश्वर परिसरात केलेल्या कारवाईत जप्त केलेला देशी-विदेशी दारूचा साठा याच कार्यालयात सीलबंद करून ठेवला होता. मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून आतील देशी दारूच्या सुमारे 900 भरलेल्या बाटल्या, 67 हजार 480 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या, असा एक लाख 41 हजार 480 रुपयांचा माल लंपास केला आहे.

कार्यालयाशेजारी राहणारे मोहन घोडके यांनी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती उत्पादन शुल्क कार्यालयाचे उदयसिंह जाधव (रा. बावधन, ता. वाई) यांना दिली. उदयसिंह जाधव यांनी चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.