सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फुटांनी उघडण्यात आले असून 38 हजार 531 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
पाणीसाठा 104.49 टीएमसी -
सोमवारी सकाळी 11 वाजता कोयना धरणाची पाणी पातळी 2162 फूट 11 इंच झाली आणि पाणीसाठा 104.49 टीएमसी झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता सांडव्यावरून 36 हजार 531 आणि पायथा विद्युत गृहातून 2100, असा एकूण 38 हजार 531 क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणी नदीपात्राबाहेर गेले आहे. तसेच पाटण तालुक्यात झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर कोयना धरणातील पाणी गडूळ झाले होते. ते अद्याप निवळलेले नाही.
हेही वाचा - मुंबई : लहान भावाशी मोबाईलवरून झालेल्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या