सातारा - कोयना धरण परिसरात बुधवारी सायंकाळी 7 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भूंकपाची नोंद रिश्टर स्केलवर 2.7 रिश्टर इतकी नोंदली गेली आहे.
हेही वाचा... मलबार हिल येथील लॅसपालमास इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर बुधवारी सायंकाळी 7 वाजता भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या भूंकपाची नोंद रिश्टर स्केलवर 2.7 रिश्टर इतकी नोंदली गेली. भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13 किलोमीटर अंतरावरील वारणा खोर्यात होता. या भुकंपाच्या धक्क्याने कोणत्याही प्रकारची वित्त अथवा जीवित हानी झालेली नाही. पाटण, वारणा आणि अलोरे या भागात भूकंपाचा तीव्रता जाणवली.