सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात म्हसवड येथील चारा छावणीमध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलगाम हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
माणदेशी फाउंडेशन आणि बजाज फाउंडेशन संचालित जनावरांच्या चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी राहिलेल्या ७४ गावांमधील सुमारे ३ हजार शेतकरी कुटुंबांनी एकत्रपणे श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी माणदेशी महिला बँक आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, बँकेचे संचालक आणि विश्वस्त अधिकारी विजय सिन्हा आणि शेतकरी उपस्थित होते.