ETV Bharat / state

बोरगावच्या सहायक निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली, सागर वाघ नवे 'कारभारी'

संचारबंदीच्या काळातील कार्यपद्धतीमुळे बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्यापुढील अडचणी वाढल्याची पोलीस दलात चर्चा आहे. मात्र चंद्रकांत माळी यांनी 'माझ्या वैयक्तिक अडचणी व बोरगावला मला होणारा त्रास यामुळे मीच वरिष्ठ‍ांकडे बदलीची विनंती केली होती' असे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माळी यांनी स्पष्ट केले.

Work Style
सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी
author img

By

Published : May 16, 2020, 10:52 AM IST

सातारा - बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळातील कार्यपद्धतीमुळे त्यांच्यापुढील अडचणी वाढल्याची पोलीस दलात चर्चा आहे. दरम्यान या संदर्भात चंद्रकांत माळी यांनी 'माझ्या वैयक्तिक अडचणी व बोरगावला मला होणारा त्रास यामुळे मीच वरिष्ठ‍ांकडे बदलीची विनंती केली होती' असे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

बोरगावच्या सहायक निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली, संचारबंदीतील 'कार्यपद्धती' भोवल्याची चर्चा

सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी यांची नऊ महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. संचारबंदीच्या काळात त्यांची कार्यपद्धती चांगलीच वादग्रस्त ठरल्याची पोलीस दलात चर्चा आहे. सातारा तालुक्यातील दोन नागरिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतले. या नागरिकांनी लेखी तक्रार करत थेट पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली होती. पोलीस मुख्यालयातील सहायक अधीक्षक समीर शेख यांनी तक्रारींच्या अनुषंगाने जाबजबाब नोंदवून गेल्या आठवड्यात अधीक्षकांना अहवाल दिला होता. त्यानंतर माळी यांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले आहेत. प्राथमिक चौकशीत आलेल्या तक्रारींमध्ये काही प्रमाणात तथ्य आढळले. मात्र ठोस पुरावे नसल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आलेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीपुर्वी त्यांच्यावर कारवाईस वाव असल्याने त्यांची तुर्तास बदली करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. सविस्तर प्राथमिक चौकशी होईल. त्यात पुढे येणाऱ्या तथ्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांची नियुक्ती‍

माळी यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांची नियुक्ती‍ करण्यात आली आहे. बदलीसंदर्भात चंद्रकांत माळी यांच्याशी संपर्क साधला असता 'माझ्या वैयक्तिक अडचणी व बोरगावला मला होणारा त्रास यामुळे मीच वरिष्ठ‍ांकडे बदलीची विनंती केली होती. त्याप्रमाणे विनंती मान्य झाली' असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.