सांगली - जिल्ह्यातील आटपाडी मध्ये असणाऱ्या सोनारसिद्ध नगरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सायली अक्षय चव्हाण असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. विषेश म्हणजे अवघ्या एक वर्षांपूर्वी अक्षय आणि सायलीचा प्रेम विवाह झाला होता. मात्र, पती अक्षय चव्हाण याने चारित्र्याच्या संशयातून तीन मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पतीसह त्याच्या साथीदारांना घटनेनंतर अवघ्या दीड तासात आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

एक वर्षापूर्वी अक्षय आणि सायली या दोघांचा प्रेम विवाह झाला होता,अक्षय हा व्यसनाधीन बनला होता. लग्नानंतर अक्षय हा दारू पिऊन उशिरा रात्री येत असल्याने सायली आणि अक्षय यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडत होते. सायली ही पती अक्षय याला दारू सोडण्यासाठी नेहेमी सांगत होती. मात्र अक्षय हा पत्नी सायलीला नेहमी मारहाण करत होता. तर काही दिवसांपासून अक्षय पत्नी सायलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडत होता. शनिवारी (२६सप्टेंबर) पहाटे पत्नी सायलीशी अक्षय याची वादावादी झाली. त्यांनतर अक्षयने सायली हिचे तोंड दाबून तिला बाथरूम मध्ये नेले. तेथे अक्षयचे अन्य तीन मित्र आगोदरच दबा धरून बसले होते. त्यांनी धारदार शास्त्राने सायलीच्या गळ्यावर वार करून निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती.
या घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळताचा आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर याठिकाणी असणाऱ्या अक्षयने अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे पोलिसांनी भासवले. मात्र पोलिसांनी गतीने तपास करत अवघ्या दीड तासात अक्षय चव्हाण व त्याचे तीन मित्र रंजीत उर्फ शिवा लालसिंग (वय, 20 साठेनगर,आटपाडी, मूळ गाव बलना उत्तरप्रदेश), अंकित कुमार विजय पालसिंह( रा.बालटेवस्ती.मूळ गाव रामगड उत्तर प्रदेश) आणि एक अल्पवयीन असे चौघांना अटक केली आहे. आटपाडी पोलीस ठाण्यात या चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.