ETV Bharat / state

सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडले हळद सौदे, सात हजारांचा उच्चांकी दर

author img

By

Published : Nov 16, 2020, 3:45 PM IST

Updated : Nov 16, 2020, 4:15 PM IST

हळदीची जागतिक बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सांगलीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. सात हजार प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर हळदीला मिळाला. कोरोनाच्या संकटामुळे मार्केट यार्डात केवळ 5 दुकानात प्रातिनिधिक सौदे काढण्यात आले.

Turmeric deals
सांगलीत हळदी सौदे

सांगली - हळदीची जागतिक बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सांगलीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. यावेळी प्रतिक्विंटल सात हजार इतका उच्चांकी दर हळदीला मिळाला आहे. तर यानिमित्ताने गुळाचे सौदेही झाले असून गुळाला 4 हजार 100 इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

सांगलीत पाजव्याच्या मुहुर्तावर हळद व गुळाचे सौदे
हळद सौद्यांची परंपरा..
हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीच्या बाजारपेठेची ओळख आहे. या बाजारात हळदीचे दर ठरतात. आज सोमवारी दिवाळी पाडाव्याच्या शुभमुहूर्तावर हळद त्याच बरोबर गुळाचेही सौदे पार पडले आहेत. पाडव्याच्या निमित्ताने सौदे काढण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि यानिमित्ताने मोठया संख्येने शेतकरी आपली हळद विक्रीसाठी घेऊन येतो, यंदा जुनी हळदीचे सौदे पार पडले. सांगलीच्या मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मुहूर्तावर हळदीचे सौदे काढले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ प्रातिनिधिक सौदे..
यंदा असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे मार्केट यार्डात केवळ 5 दुकानात प्रातिनिधिक सौदे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार कमी गर्दी करत हळदीचे सौदे पार पडले आहेत आणि जुन्या हळदीला चार हजारपासून दर मिळाले आहेत. तर 7 हजार इतका उच्चांकी दर प्रतिक्विंटल मिळाला आहे.
गुळालाही चांगला दर -
दरम्यान पाडव्याच्या निमित्ताने गुळाचे सौदेही यावेळी पार पडले आहेत. पाच दुकानात पार पडलेल्या या सौदयां मध्ये प्रतिक्विंटल गुळाला ३ हजार पासून दर मिळाला आहे.मुंबई मार्केटच्या गुळाला सर्वाधिक 4 हजार 100 इतका उच्चांकी दर मिळाला आहे.या मुहूर्तावर मुंबई व गुजरात मार्केट मधून सुमारे 15 ट्रक गुळाची आवक झाली होती.
बाजारात यंदा फील गुड..
कोरोनाच्या स्थिती नंतर पार पडलेल्या सौद्यांना चांगला प्रतिसाद सांगलीच्या बाजारात मिळाल्याचे मत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व गूळ व्यापारी शरद शहा यांनी व्यक्त केले आहे. जरी कोरोनाची स्थिती असली तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मोठया प्रमाणात येत आहे, शिवाय दरही चांगले मिळत आहेत, त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये फील गुड वातावरण असल्याचेही शरद शहा म्हणाले.

Last Updated : Nov 16, 2020, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.