ETV Bharat / state

सुरेश खाडेंच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे भाजप कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत..

भाजपचे चार आमदार, एक खासदार अशी स्थिती असणाऱ्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात कधी स्थान मिळणार याची प्रतीक्षा अखेर संपली. मिरजेचे आमदार खाडे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद शेवटी मिळाले. त्यामुळे खाडेंच्या समर्थकांनी जल्लोष केला..

सांगली
author img

By

Published : Jun 16, 2019, 9:54 PM IST

सांगली - मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून आज सुरेश खाडे यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष केला आहे.

सांगली

भाजपचे चार आमदार, एक खासदार अशी स्थिती असणाऱ्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात कधी स्थान मिळणार याची प्रतीक्षा अखेर संपली. मिरजेचे आमदार खाडे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद अखेर मिळाले आहे. तीन वेळा भाजपचे आमदार म्हणून सुरेश खाडे निवडून आलेले आहेत. जतसारख्या दुष्काळी तालुक्‍यात पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर सुरेश खाडे यांनी निवडणूक लढवत जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलवले होते. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकी वेळेस मिरजेतून सुरेश खाडे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. उद्योजक ते मंत्री असा सुरेश खाडे यांचा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण राहिला आहे. तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळ जन्मगाव अत्यंत गरीब घरात खाडे यांचा जन्म झाला होता.

एक नजर टाकूया मंत्री खाडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर

नाव :- आमदार डॉ.सुरेश दगडू खाडे

जन्मदिनांक :- १ जून १९५८

शिक्षण :- १) वेल्डिंग डिप्लोमा ( व्हिजीटी आय , मुंबई ) ब्रान्झ व सिल्वर मेडल

२) डॉक्टरेट , कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका )

व्यवसाय :- उद्योग व शेती

आमदार सुरेश खाडे हे २००४ साली जत मधून, २००९ साली मिरज मधून आणि २०१४ साली पुन्हा मिरजमधून असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सुरेश खाडे हे भाजपचे सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार आहेत. त्यापूर्वी त्यांनी १९९९ ला जत राखीव मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

भाजपमध्ये सुरेश खाडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या गटाचे म्हणूनओळखले जातात. उद्योजक असणाऱ्या सुरेश खाडे यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातून केली.

भूषविलेले पदे :-

(1 ) सदस्य अनुसूचित कल्याण समिती , महाराष्ट्र विधानसभा.

(2) सदस्य अंदाज समिती , महाराष्ट्र विधानसभा

(3) सदस्य पंचायत राज समिती , महाराष्ट्र विधानसभा

(4) सदस्य उपविधान समिती , महाराष्ट्र विधानसभा

(5) संचालक, राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरी

(6) सांगली जिल्हा भाजप, अध्यक्ष ( ग्रामीण )

काँग्रेस आघाडीच्या सत्तेनंतर चार वर्षांपासून सांगली जिल्ह्याला भाजपकडून केवळ सदाभाऊ खोत यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद मिळाले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही,असा प्रश्न कायम होता. पण, अखेरच्या काळात भाजपने मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद देऊन सांगलीचा मंत्रिमंडळ समावेशाचा प्रश्न संपवून टाकला आहे. रविवारी सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर मिरजमध्ये सुरेश खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send file name - MH_SNG_KHADE_MINISTER_JALLOSH_16_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_KHADE_MINISTER_JALLOSH_16_JUNE_2019_VIS_4_7203751

स्लग - सुरेश खाडे यांच्या मंत्री मंडळातील समावेशाचे भाजपा कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत..

अँकर - मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालाय कॅबिनेट मंत्री म्हणून आज सुरेश खाडे यांनी शपथविधी घेतली आहे शपथविधी सोहळ्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी आणि खाली समर्थकांनी जल्लोष केला आहे.Body:व्ही वो - भाजपाचे चार आमदार, एक खासदार अशी स्थिती असणाऱ्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात कधी मिळणार याची प्रतीक्षा अखेर संपली आहे.मिरजेचे आमदार खाडे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पदा अखेर मिळाले आहे.तीन वेळा भाजपचे आमदार म्हणून सुरेश खाडे निवडून आलेले आहेत.जतसारख्या दुष्काळी तालुक्‍यात पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर सुरेश खाडे यांनी निवडणूक लढवत जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलावले होते.गेली दोन टर्म मिरजेतून सुरेश खाडे यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे जेष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.उद्योजक ते मंत्री असा सुरेश खाडे यांचा प्रवास अत्यंत संघर्ष राहिला आहे तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळ जन्मगाव अत्यंत गरीब घरात खाडे यांचा जन्म झाला होता .

एक नजर टाकूया मंत्री खाडे यांच्या आजवरच्या कारकीर्दवर

नाव :- आमदार डॉ .सुरेश दगडू खाडे

जन्मदिनांक :- १ जून १९५८

शिक्षण :- १) वेल्डिंग डिप्लोमा ( व्हिजीटी आय , मुंबई ) ब्रान्झ व सिल्वर मेडल

२) डॉक्टरेट , कोलंबो युनिव्हरसिटी , श्रीलंका )

व्यवसाय :- उद्योग व शेती

आमदार सुरेश खाडे हे २००४ साली जत मधून, २००९ साली मिरज मधून आणि २०१४ साली पुन्हा मिरज मधून असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सुरेश खाडे हे भाजपचे सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार आहेत.त्यापूर्वी त्यांनी १९९९ ला जत राखीव मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

भाजपा मध्ये सुरेश खाडे स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या गटाचे म्हणून
ओळखले जातात.

उदयोजक असणार्या सुरेश खाडे यांनी आपल्या राजकिय जीवनाची वाटचाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातून केली.

भूषविलेले पदे :-

(1 ) सदस्य अनुसूचित कल्याण समिती , महाराष्ट्र विधानसभा.

(2) सदस्य अंदाज समिती , महाराष्ट्र विधानसभा

(3) सदस्य पंचायत राज समिती , महाराष्ट्र विधानसभा

(4) सदस्य उपविधान समिती , महाराष्ट्र विधानसभा

(5) संचालक , राहुरी कृषी विद्यापीठ , राहुरी

(6) सांगली जिल्हा भाजपा , अध्यक्ष ( ग्रामीण )Conclusion:काँग्रेस आघाडीच्या सत्तेनंतर चार वर्षापासून सांगली जिल्ह्याला भाजपाकडून केवळ सदाभाऊ खोत यांच्य रूपाने राज्यमंत्रीपद मिळाले होते. मात्र भाजपच्या नेत्यांना मंत्री मंडळात स्थान मिळणार की नाही,असा प्रश्न कायम होता.पण अखेरच्या काळात भाजपाने मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद देऊन सांगलीचा मंत्रिमंडळ समावेशाचा प्रश्न संपवुन टाकला आहे. रविवारी सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. तर मिरजे मध्ये सुरेश खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.