ETV Bharat / state

सांगली : इस्लामपूरमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण, 'त्या' चार कोरोनामुक्त व्यक्तींच्या संपर्कातील नातेवाईक

सांगलीच्या इस्लामपूरमधील पाच जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे.

शासकीय रुग्णालय मिरज
शासकीय रुग्णालय मिरज
author img

By

Published : Apr 6, 2020, 5:02 PM IST

सांगली - जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये आणखी एका महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. आज आलेल्या पाच चाचण्यांपैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला इस्लामपुरच्या 'त्या' चार कोरोनामुक्त रुग्णांची नातेवाईक महिला आहे.

कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झालेली सांगलीची वाटचाल थांबली आहे. आज एका महिलेची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या चार कोरोना मुक्त रुग्णांच्या संपर्कात आलेली ही महिला त्यांची नातेवाईक आहे. ही महिला होम क्वारंटाईन मध्ये होती. तिच्यात कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर प्रशासनाने तिचे स्वॅब टेस्ट घेतले होते. तसेच आणखी चौघांचेही स्वॅब टेस्टसाठी घेण्यात आले होते.आज दुपारी या पाचही जणांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून यामध्ये एक महिलाला कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर आरोग्य विभागाने या महिलेस मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे.

इस्लामपूरमधील सौदी अरेबियावरुन आलेल्या पहिल्या चार कोरोना रुग्णांची रविवारी (दि. 5 एप्रिल) कोरोनामुक्त घोषणा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्याची पूर्ण मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे, अशी स्थिती निर्माण झाली होती. 25 चा आकडा 21 वर पोहोचला होता. मात्र, आज त्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सांगलीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 22 वर पोहोचला आहे. सध्या जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याकडून सांगण्यात आला आहे.

हेही वाचा - Good News : सांगलीच्या अभियंता दाम्पत्याने बनवले भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.