ETV Bharat / state

Minister Suresh Khade : आता जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सज्ज व्हा - कामगार मंत्री सुरेश खाडे - Minister Suresh Khade interacted with BJP workers

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा, असे आवाहन कामगार मंत्री सुरेश खाडे (Labor Minister Suresh Khade) यांनी केले आहे. त्याच बरोबर 42 गावांच्या पाण्यासाठी विस्तारित म्हैशाळ योजनेचे 1 हजार कोटींचे पहिले टेंडर 15 जानेवारी रोजी जाहीर होणार, असल्याचेही खाडे यांनी स्पष्ट केले. (Sangli) मिरजेतील बेडग याठिकाणी ते (interacted with BJP workers) बोलत होते.

Minister Suresh Khade
कामगार मंत्री सुरेश खाडे
author img

By

Published : Jan 1, 2023, 7:05 PM IST

प्रतिक्रिया देतांना कामगार मंत्री सुरेश खाडे

सांगली : जिल्ह्यातील (Sangli) ग्रामपंचायत निवडणूकितील निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा सत्कार, कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री मंत्री सुरेश खाडे (Labor Minister Suresh Khade) यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील बेडग याठिकाणी पार पडला. या प्रसंगी खासदार संजयकाका पाटील व मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना (interacted with BJP workers) परत मंत्री सुरेश खाडे यांनी ग्रामपंचायत मध्ये भाजपाला चांगला यश मिळालेले आहे. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असून, आता आगामी आगामी जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

तसेच जत तालुक्यातल्या 42 गावांसाठी विस्तारित म्हैशाळ सिंचन योजनेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी 1 हजार कोटींचं पहिलं टेंडर जाहीर होईल, अशी माहिती कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. त्यानंतर 1 हजार कोटींची दुसरा टप्पा असेल,असे ही मंत्री खाडे यांनी स्पष्ट केले. ते मिरज तालुक्यातील बेडग याठिकाणी बोलत होते. त्याचबरोबर सिंचन प्रकल्प सोलार प्रकल्पावर करण्याचा देशातलं पायलट प्रोजेक्ट म्हैशाळ या ठिकाणी होणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी स्पष्ट केले असून; 1500 कोटीची योजना असून यासाठी जर्मन बँकेचे अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्य सरकार यामध्ये 30 टक्के निधी देणार आहे. तो निधी देण्याबाबत कॅबिनेट मध्ये मंजूरी देखील घेतली आहे, अशी माहितीही मंत्री खाडे यांनी दिली आहे. तसेच सोलर प्रकल्पामुळे वीज बिला अभावी सिंचन योजना बंद होण्याचा प्रश्न सुटणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.