सांगली - मिरज-कोल्हापूर आणि मिरज-ढालगाव विद्युत रेल्वे इंजिन चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. ताशी 100 किलोमीटर वेग असणारी ही विद्युत रेल्वे सेवा मे 2020 मध्ये सुरू होणार आहे.
हेही वाचा - हरित फटाके म्हणजे काय रे भाऊ! शिवकाशीच्या कारखान्यातील कामगारच विचारतात प्रश्न
मिरज ते पुणे,मिरज-कोल्हापूर ,मिरज -लोंढा आणि मिरज-सोलापूर या रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच याठिकाणी विद्युत रेल्वेचे काम ही अंतिम टप्प्यात पोहचले आहे. कोल्हापूर ते मिरज आणि मिरज-सोलापूर मार्गावरील ढालगाव पर्यंत विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गावरील चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. लोकोमोटो या विद्युत इंजिनची मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
हेही वाचा - इगतपुरी रेल्वेस्थानकात पुष्पक एक्स्प्रेसचा डब्बा रूळावरून घसरला
कोल्हापूर ते मिरज अशी पहिली विद्युत रेल्वेची चाचणी घेण्यात आली. ताशी 100 वेग असणारी ही रेल्वे 2.35 मिनिटांनी कोल्हापूर मधून निघाली आणि मिरजेत ती 3.45 मिनिटांनी यशस्वीरित्या पोहोचली. तर यानंतर मिरज ते सोलापूर मार्गावरील ढालगाव पर्यंत दुसरी चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या. मिरज रेल्वे जंक्शनवर यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मे 2020 अखेर सर्व मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन ही विद्युत रेल्वे सेवा सुरू होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱयांनी यावेळी व्यक्त केला आहे.