ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू; शिराळा तालुक्यातील घटना

author img

By

Published : Mar 4, 2021, 6:57 AM IST

बिऊर गावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. सुनील गोसावी हा आपल्या नातेवाईकांच्या समवेत तलावात पोहण्यासाठी गेला होता. सुनील हा इस्लामपूर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.

Lake
तलाव

सांगली - शिराळा तालुक्यातील बिऊर येथे तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. सुनील तानाजी गोसावी, असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

पोहायला गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू

नातेवाईकांसोबत गेला होता पोहण्यासाठी -

शिराळा तालुक्यातल्या बिऊर या ठिकाणी सुनील गोसावी हा आपल्या नातेवाईकांच्या समवेत तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याचा भाऊ संतोष गोसावी, मावस भाऊ जगन्नाथ वसूरकर, सुभाष वसूरकर, मामा विठ्ठल घाडगे हे होते. सुनील एकटाच पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता तर नातेवाईक काठावरती बसले होते.

न ऐकणे बेतले जीवावर -

सुनील खूपवेळ पाण्यात पोहत होता. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला बाहेर येणास सांगितले. मात्र, तो येत नसल्याने आम्ही जातो असे म्हणून सर्वजण रस्त्यावर आले. तोपर्यंत सुनील पाण्यात बुडू लागला. हा प्रकार त्याठिकाणी असलेल्या मेंढपाळने पाहिली. त्याने आरडा-ओरड केल्यानंतर सुनीलचा भाऊ संतोष, मावसभाऊ जगन्नाथ, सुभाष व मामा विठ्ठल धावत खाली आले. तोपर्यंत सुनील पाण्यात बुडाला होता. त्यानंतर बुडालेल्या सुनीलचा शोध सुरू झाला. मात्र, पाणी खोलवर असल्याने शोध घेण्यात अडचणी आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी व पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन शोध सुरू केला. सायंकाळच्या सुमारास सुनीलचा मृतदेह सापडला. सुनील हा इस्लामपूर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.