सांगली - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने काका-पुतण्याच्या पोटात कळ उठली आहे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांनी केली आहे. काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचे भले होऊ द्यायचे नाही. त्यामुळेच ईडब्ल्यूसी रद्द झाले, अशी टीकाही पडळकरांनी शरद पवार आणि अजित पवारांच्यावर केली ( Gopichand Padalkar on Sharad Pawar ) आहे. ते आटपाडीच्या झरेमध्ये बोलत होते.
निर्णय उच्च न्यायालयाने रद्द - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवारांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार पडळकर म्हणाले, मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने EWS चा लाभ देण्याचा ठाकरे - पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मी त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही.
-
काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये. घराणेशाहीला संधी न मिळता साध्या मराठा कुटुंबात मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्या पै पाव्हण्यांचं भलं करायचंय. @mieknathshinde @BJP4Maharashtra pic.twitter.com/hdOiCTJhEV
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये. घराणेशाहीला संधी न मिळता साध्या मराठा कुटुंबात मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्या पै पाव्हण्यांचं भलं करायचंय. @mieknathshinde @BJP4Maharashtra pic.twitter.com/hdOiCTJhEV
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 30, 2022काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये. घराणेशाहीला संधी न मिळता साध्या मराठा कुटुंबात मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्या पै पाव्हण्यांचं भलं करायचंय. @mieknathshinde @BJP4Maharashtra pic.twitter.com/hdOiCTJhEV
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 30, 2022
'म्हणून यांच्या पोटात कळ उठतेय '- आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचे भले होऊ द्यायचे नाही. त्याचप्रमाणे काका पुतण्याचे हे दुखः आहे की, मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली, म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायेत. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचेय, हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा असल्याची पडळकरांनी पवारांवर टीका केलेली आहे.