ETV Bharat / state

जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी सुटणार बस; 8 जिल्ह्यामंध्ये 25 एस.टी. बस जाणार

रत्नागिरीतील विविध बसस्थानकांमधून त्याच्या गावी एस. टी. बसने जाता येणार आहे. या 25 एस. टी. बस 8 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहेत. ज्यांना प्रवासासाठी परवानगी मिळाली आहे. त्याच नागरिकांनी बसस्थानकावर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ratnagiri ST bus departure
रत्नागिरीतून सुटणार 25 बस
author img

By

Published : May 8, 2020, 11:57 AM IST

Updated : May 8, 2020, 12:31 PM IST

रत्नागिरी- लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यामधील नागरिक अडकले होते. या नागरिकांना रत्नागिरीतील विविध बसस्थानकांमधून त्याच्या गावी एस. टी. बसने जाता येणार आहे. या 25 एस. टी. बस 8 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार मंजुरी प्राप्त झालेल्या व्यक्तींना त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येईल.

जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी सुटणार बस; 8 जिल्ह्यामंध्ये 25 एस.टी. बस जाणार

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व वाहतूक बंद झाली व जिल्हयांच्या सीमा बंद झाल्या. त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊनची मुदत वाढलेली आहे. याबाबत राज्यात झालेल्या निर्णयानुसार आता जिल्हयात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे शक्य होणार आहे. नागरिकांना यासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

जिल्हातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदूर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या 8 जिल्ह्यांना जाणाऱ्या बसेस सुटतील. यात ज्यांच्याकडे अशा प्रवासाची परवानगी आहे अशांनीच आपापल्या शहरातील बसस्थानकावर वेळेच्या 2 तास आधी पोहचायचे आहे. प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य तपासणी पत्र असणे अनिवार्य आहे. प्रत्येकांने मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

Last Updated : May 8, 2020, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.