ETV Bharat / state

गुहागर तालुक्यातील बोऱ्या येथे अवैध मद्यसाठा जप्त, पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Jul 24, 2020, 6:31 PM IST

गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील बोऱ्या गावात एक महिला गावठी हातभट्टीची व विदेशी बनावटीची दारू विक्रीचा चोरुन व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकत एकूण ५ लाख ८१ हजार ९९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुहागर पोलिसांची कारवाई
गुहागर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील बोऱ्या येथे पोलिसांनी छापा टाकत मद्य साठ्यासह एकूण 5 लाख 81 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गावठी व विदेशी दारूचा समावेश आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील बोऱ्या गावात एक महिला गावठी हातभट्टीची व विदेशी बनावटीची दारू विक्रीचा चोरुन व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मद्यसाठा जप्त केला सोबतच 5 लाखांचे चारचाकी वाहनही जप्त केले आहे. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकुर, नितेश दिनेश आरेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.