रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22 जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर तत्काळ बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी सुरू केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह सापडले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी भेंदवाडी या गावाला भेट दिली. आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
या दुर्घटनेप्रकरणी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, क, ग्रामस्थांनी या धरणाच्या गळती संदर्भात निवेदन दिले होते. त्यामध्ये त्यांनी धरणाच्या दुरस्तीबाबत मागणी केली होती. मात्र, ती व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. या धरणफुटी संदर्भात चर्चा केलीय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी....