रत्नागिरी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या खेड तालुक्यातील मुंबके गाव आणि परिसरातील संपत्तीचे मूल्याकंन पूर्ण झाले आहे. अँन्टी स्मगलिंग एजन्सीच्या टीमने संपत्तीचे मूल्याकंन केले. दाऊदच्या एकुण १४ मालमत्तांचे मूल्यांकन झाले.
दाऊदने मुंबके गावात १९७८-७९ मध्ये घर बांधायला सुरूवात केली होती. १९८० मध्ये मुंबके गावात ३ मजली टोलेजंग घर बांधून पुर्ण झाले. गेल्या ३५ वर्षापुर्वी इन्कम टॅक्सने ते घर सिल केले आहे. ते घर दाऊदच्या आईच्या नावावर आहे.
दाऊदच्या मालमत्तांचे मूल्यनिर्धारण करण्याचे काम आयकर विभागाचे अधिकारी जोसेफ व त्यांच्या सहकार्यांनी सुरु केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण गजभिये व सुयोगकुमार उपस्थित होते. या टीमने दाऊदच्या बंगल्याची, जागेची पाहणी केली. दाऊदच्या एकूण 14 मालमत्तेच मुल्यांकन केले. तसेच यासाठी इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी देखील मुंबके गावात आज दाखल झाले. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या नातेवाइंकांच्या नावे असणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली जाणार असून, त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी आपला अहवाल साफेमाकडे देतील.
या टीमकडून दाऊदचे घर, त्याच्या आजूबाजूच्या बागा तसेच इतर मालमत्ताची पाहणी करण्यात आली. या सर्व मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आई अमिना यांच्या नावे आहेत. खेडमधील मुख्य मालमत्ता या दाऊदची बहिण हसीनाच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमिनाबीच्या नावे आहे.
मुंबके गावात ३ मजली एक बंगला, एक एकर जागेत २५-३० झाडांची आंबा कलम बाग, लोटे एमआयडीसी येथे महामार्गावर पेट्रोल पंपासाठीचा प्लॉट व अन्य एक प्लॉट त्याची बहीण हसिना पारकर हिच्या नावे आहे. दाऊदचे बहीण-भाऊ मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात. हे सर्व लोक १९८० च्या दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. मात्र १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडला आहे. या ठिकाणच्या भिंतीवर काही लिखाण केले आहे. गेली अनेक वर्ष पडून असलेल्या या घराभोवती मोठमोठाली झाडे वाढली आहेत. ३ मजली टोले जंग असलेली ही इमारत कधी कोसळेल अशीच आवस्था झाली आहे. इमारत ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासदंर्भात विचार सुरु होते.
दाऊदचा हा बंगला सेल्फी पॉईंटसुद्धा बनत चालला होता. काहीच दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा १.८ कोटी रुपयांना लिलाव झाला होता. त्यानंतर आता दाऊदच्या त्याच्या मुळ गावातील मालमत्तेवर टाच आणली जात आहे. त्यासाठी मुल्यांकन करण्याची पहीले पाऊल उचलले गेले आहे. दाऊद खेडमधील या बंगल्यात नेहमी यायचा. शिवाय पेट्रोल पंपासाठी एक प्लॉटही आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिका-यांना या १४ मालमत्तांची किंमत ठरविण्यास सांगितले आहे. या सर्व मालमत्ता दाऊदच्या नातेवाईकांच्या नावावर असून गुन्हेगारीच्या पैशातून या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत.
मुंबके येथील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी मदत केली. या सगळ्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन झाले आहे. या संपत्तीची किंमत किती होईल यापेक्षा डॉनची प्रॉपर्टी कोण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.