ETV Bharat / state

रत्नागिरी : ओणी-अनुस्कारा रस्त्यात 10 फूटाचे खड्डे; प्रवासी त्रस्त - etv bharat live

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मनसेने पाचल भागात मोर्चा काढला. यावेळी रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशाराही दिला आहे.

konkan situation of potholes
konkan situation of potholes
author img

By

Published : Oct 18, 2021, 5:32 PM IST

रत्नागिरी - कोकणातील रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील ओणी-अनुस्कारा रस्त्यात 10 फूट लांबीचे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

ओणी-अनुस्कारा रस्त्यात 10 फूटाचे खड्डे
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मनसेने पाचल भागात मोर्चा काढला. यावेळी रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशाराही दिला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अणुस्कुरामार्गे सर्वच वाहतूक होत आहे.
konkan situation of potholes
ओणीचा रस्ता

काही ठिकाणी तब्बल 10 फूटाचे खड्डे

अणुस्कुरा - पाचल - ओणी या रस्त्यांवर काही ठिकाणी 10 फूट तर काही ठिकाणी पाच ते सात फूटाचे खड्डे आहेत. शिवाय, रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर नक्की रस्ता की खडकाळ पायवाट हा प्रश्न पडावा अशी अवस्था नि्र्माण झाली आहे. पुणे, कोल्हापूर मार्गे होणारी प्रवाशी आणि माल वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मात्र, रस्त्यावर केवळ खड्डेच असल्याने या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक जण संताप व्यक्त करत आहे.

हेही वाचा - रणजीत सिंह खून प्रकरण: बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून आजन्म तुरुंगवासाची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.