रायगड - रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिक मोठ्या संख्येने आजाराने ग्रस्त झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आता हळूहळू कमी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हा मार्चपासून वाढला असला तरी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात बेड, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर याची कमतरता पडलेली नाही. काही प्रमाणात बेडची कमतरता रुग्णांना जाणवू लागली असली तरी प्रशासनाकडून बेड वाढविले गेले आहेत.
हेही वाचा - धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस
जिल्ह्यात सात हजार सात ऍक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली. जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 795 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 1 लाख 27 हजार 986 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. 1 लाख 17 हजार 962 कोरोना रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. 3 हजार 17 जणांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 7 हजार 7 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
जिल्ह्याचे बेडची उपलब्धता
जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात 3 हजार 545 जनरल बेड, ऑक्सिजन बेड 2 हजार 553, आयसीयू बेड 640 तर व्हेंटिलेटरचे 256 बेड उपलब्ध आहेत. रायगड ग्रामीण भागात 1010 तर पनवेल महानगर पालिका क्षेत्रात 1085 असे 2 हजार 95 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. ग्रामीण भागात 431 जनरल बेड, 468 ऑक्सिजन बेड, 111 आयसीयू तर व्हेंटिलेटरवर 45 रुग्ण उपचार घेत आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात जनरल बेड 177, ऑक्सिजन 629, आयसीयू 279 तर व्हेंटिलेटरवर 143 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत शिल्लक बेड जिल्ह्यात 2095 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत 2 हजार 937 जनरल बेड, 1456 ऑक्सिजन बेड, 250 आयसीयू तर 68 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे बेड उपलब्धता असल्याने रुग्णाचे हाल होत नाहीत. औषधाचा साठाही उपलब्ध आहे.
हेही वाचा - पुणे : लॉकडाऊनमध्ये हॉटेल सुरू ठेवल्याने काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल