ETV Bharat / state

रायगडमधील प्रसिद्ध वालाची पोपटी, पदार्थामुळे मिळू शकतो पर्यटनाला वाव

author img

By

Published : Feb 15, 2021, 9:04 PM IST

घाट माथ्यावर जशी हुरडा पार्टी प्रसिद्ध आहे तशीच रायगड जिल्ह्यात पोपटी पार्टीही प्रसिद्ध आहे. डिसेंबर ते मार्चपर्यंत ही वालाची पोपटी खाण्यास मिळते. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकानांही पोपटीचे आकर्षण आहे. मात्र तरीही पोपटीला ग्लॅमर मिळण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पोपटीमधूनही जिल्ह्यात पर्यटनाला वाव मिळू शकतो

रायगड - थंडीचा हंगाम सुरू झाला की रायगडात वालाच्या शेंगांच्या पोपटीचा सुवास सगळीकडे दरवळू लागतो. शाकाहारी, मांसाहारी पोपटीचा आस्वाद शेतात, मोकळ्या जागेत, इमारती परिसरात कोटुंबिक, मित्र परिवार एकत्र येत आहेत. घाट माथ्यावर जशी हुरडा पार्टी प्रसिद्ध आहे तशीच जिल्ह्यात पोपटी पार्टीही प्रसिद्ध आहे. डिसेंबर ते मार्चपर्यंत ही वालाची पोपटी खाण्यास मिळते. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकानांही पोपटीचे आकर्षण आहे. मात्र तरीही पोपटीला ग्लॅमर मिळण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रायगडात येणाऱ्या पर्यटकांनाही पोपटीची चव चाखायला मिळली पाहिजे असे म्हटले जाते. पोपटीमुळे पर्यटनाला देखील एक वेगळी चालना मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

पदार्थामुळे मिळू शकतो पर्यटनाला वाव
मडक्यात आगीच्या ज्वाळात शिजते पोपटीपोपटी म्हणजे वालाच्या शेंगा, चिकन, अंडी, बटाटे, रताळी, ओवा, जाडे मीठ हे पदार्थ एकत्रित करून केलेला खाद्य पदार्थ असतो. विषेश म्हणजे यात भांबुरडीचा पाला हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मडक्यात सर्व पदार्थ व्यवस्थित भरून त्यानंतर त्याला बाजूने आग लावली जाते. आगीच्या ज्वाळाने मडके गरम होऊन आतील जिन्नस शिजवले जाते. त्यात टाकलेल्या भांबुरडी पाल्याने पोपटीचा सुवास दरवळला जतो.पोपटीमुळेही पर्यटनाला चालना मिळू शकतेपोपटी हा खाद्य पदार्थ रायगडमध्ये प्रसिद्ध आहे. डिसेंबर ते मार्च असा तीन महिने पोपटीचा हंगाम असतो. रायगडात येऊन पोपटी खाणे ही खवय्यांसाठी पर्वणी आहे. मात्र अद्यापही पोपटीकडे शेतकरी हा ग्लॅमर पद्धतीने पाहत नाही. पोपटी खाद्य पदार्थातूनही पर्यटन वाढीस मदत होऊ शकते. जिल्ह्यात लाखो पर्यटक पर्यटनासाठी येतात. ताजी मासळीचा आस्वाद घेण्यासोबतच पर्यटकांना शेतात बसून पोपटीचा आस्वाद दिला तर त्यातूनही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोपटी पार्ट्यांचे आयोजन पोपटी हंगाम काळात केल्यास पर्यटनाला एक वेगळी चालना मिळू शकते.कशी केली जाते पोपटी?पोपटीसाठी मुख्य जिन्नस म्हणजे वालाच्या शेंगा, भातपिक कापणी झाल्यावर ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात वालाचे पीक घेतले जाते. वालाचे पीक हे साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यात यायला सुरुवात होते. पुणे येथील वाल हे येत असले तरी पोपटीला रायगडच्या वालाची चव येत नाही. त्यामुळे रायगडचा वाल बाजारात येण्यास सुरुवात झाली की पोपटीसाठी वाल खरेदीसाठी खवय्यांची पावले शेतात आणि बाजारात वळू लागतात. वालाच्या शेंगा धुवून स्वच्छ केल्या जातात. त्यानंतर चिकनला मसाला, मीठ लावून काही वेळ मुरण्यास ठेवले जाते. बटाटी, रताळी कापून त्यात मीठ मसाला भरला जातो. त्यानंतर पोपटी मडक्यात भरण्यास सुरुवात केलीं जाते. आधी मडक्यात भांबुरडी पाला टाकून त्यावर वालाच्या शेंगा, चिकन, अंडी, बटाटी, रताळी, काहीजण कांदा ही टाकतात. त्यावर मीठ, ओवा, शेंगदाणे टाकले जातात. असे एकावर एक थर करून वर पुन्हा भांबुरडी पाल्याने मडक्याचे तोंड बंद केले जाते. त्यानंतर मडक्याच्या बाजूला आग लावून आगीच्या घगात पोपटी शिजवली जाते. पोपटी शिजली की नाही हे बघण्याचे एक शास्त्र आहे. गरम माडक्यावर पाणी टाकून चर्रर्र असा आवाज येऊन पाणी त्वरित सुकले की पोपटी तयार झाली असे समजते. तसेच भांबुरडी आणि शेंगांचा वास दरवळू लागल्यावर मडके बाहेर काढले जाते.

शरीराला बाधत नाही पोपटी
गरमागरम मडके आगीत बाहेर काढल्यानंतर पोपटी केळीच्या पानावर किंवा गोंता, कागदावर टाकली जाते. त्यानंतर गरमागरम पोपटीवर ताव मारला जातो. आगीच्या धगीवर शिजणारी ही पोपटी स्वादिष्ट आणि रुचकर असल्याने ती कितीही खाल्ली तरी शरीराला बाधत नाही हे विशेष. थंडीच्या हंगामात पोपटी खाण्याचा एक वेगळाच अनुभव खवय्यांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे पर्यटकही या काळात फिरण्यास आल्यानंतर पोपटीचा आस्वाद घेत असतो.

हेही वाचा - कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.