रायगड - जिल्हा मुख्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप माने यांनी आज (रविवारी) आपल्या महाड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले असले तरी कौटुंबिक कारणातून केली असल्याचे बोलले जात आहे. महाड पोलीस याबाबत तपास करित आहेत. जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या आत्महत्येबाबतची ही चौथी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड पोलीस दल चर्चेत आले आहे.
हेही वाचा - दहशत पसरविण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार, एकाला मारहाण
सहायक पोलीस निरीक्षक संदीप माने हे गेली पंधरा वीस वर्षे पोलीस खात्यात काम करित होते. सध्या त्याची नेमणूक अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर होती. 29 जानेवारी पासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत ते रजेवर होते. महाड तालुक्यातील शिरगाव हे माने यांचे मुळ गाव. सुट्टी घेऊन ते आपल्या गावी आले होते. आज (रविवारी) दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरी घराच्या छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर महाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. या आत्महत्येबाबत कारण स्पष्ट झाले नसून, याबाबत महाड पोलीस अधिक तपास करित आहेत.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील देवपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या