ETV Bharat / state

मुलांचे शारीरिक अन् मानसिक आरोग्य सुधारणे गरजेचे

कोरोनामुळे शाळा बंद होत्या. सुमारे दहा महिन्यांनंतर शाळा सुरू झा्या आहेत. मात्र, टाळेबंदीमधील व शाळा सुरू झाल्या नंतर मुलांच्या दिनक्रमात झालेल्या बदलाबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी क्रीडा शिक्षक, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आपले मत मांडले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 28, 2021, 5:09 PM IST

Updated : Jan 28, 2021, 5:29 PM IST

रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत शाळाही बंद होत्या. टाळेबंदीच्या काळात ऑनलइन शिक्षण सुरूच होते. मात्र, याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला आहे. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या रोजच्या दिनक्रमात बदल होऊ शकतात. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या बदललेल्या दिनक्रमाबाबत पुढे काय उपाययोजना कराव्यात याबाबत क्रीडा शिक्षक, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आपले मत मांडले.

बोलताना तज्ज्ञ व क्रीडा शिक्षक

मुलांसोबत पालकांची बैठक घ्या - डॉ. राजीव धामणकर

कोरोनाने शाळातील वर्ग ऑनलाइन सुरू असल्याने मुलेही मोबाईलमध्ये जास्त गुंतत आहेत. टीव्ही पाहू लागली आहेत. कोरोना असल्याने पालक मुलांना बाहेरही खेळण्यास पाठवत नव्हते. त्यामुळे मुलं एकलकोंडी झाली आहेत. घरात बसून मुलांचे वजन वाढू लागले, चिडचिडी झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांना रोज गोष्टीचे पुस्तक, पेपर वाचण्यास द्या, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा, मित्रांसोबत ग्रुप तयार करून प्रत्येक पालकांनी त्यांच्याशी संवाद साधा. आता शाळा सुरू होत असल्याने त्यांच्या दिनचर्येत फरक पडणार आहे. मुलांना मैदानी खेळही खेळण्यास प्रवृत्त करा, असे मत अलिबागमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर यांनी व्यक्त केले आहे.

मुलांना वेळ द्या, त्यांच्या कलाने घ्या - डॉ. अमोल भुसार

दहा महिन्यांनी शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे मुले ही आनंदित झाली आहेत. पुन्हा मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत. ऑनलाइन शिक्षणातून आता बाहेर पडून शाळेत अभ्यास करणार आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी शाळेचा अभ्यास करणार असल्याने त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीबाबत वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. मैदानी कवायत, योग करण्यास प्रवृत्त करा. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे व याची आठवणही मुलांना वारंवार करून देणे. शाळा सुरू होत असल्याने मुले आनंदित आहेत. फक्त त्यांना वेळ देणे गरजेचे आहे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी व्यक्त केले आहे.

मैदानी खेळाने मुलांची शारीरिक क्षमता वाढू शकते - यतीराज पाटील

कोरोनामुळे मुले घरी असल्याने वजन वाढले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने डोळ्याचे विकार वाढले आहेत. त्यामुळे मुलांनी धावणे, चालणे, पोहणे, योग करणे गरजेचे आहे. मैदानी खेळामुळे त्याचे आरोग्य सदृढ होण्यास मदत मिळणार आहे. आता शाळा सुरू झाल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे आमच्यासमोर एक आव्हान आहे, असे मत क्रीडा शिक्षक यतीराज पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - न्हावा शिवडी सीलिंक विरोधात प्रकल्पबाधित नागरिकांचा शुक्रवारी मोर्चा

Last Updated : Jan 28, 2021, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.