रायगड - छत्रपती संभाजी महाराज यांचा तीथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा तर तारखे प्रमाणे शिवजयंती एकाच दिवशी आल्याने दुग्धशर्करा योग आला आहे. आज किल्ले रायगडावर दोन्ही कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. राज सदरेपर्यंत मिरवणूक आणून राज्याभिषेक सोहळ्याला सुरवात करण्यात आली. यावेळी विधीवत पुजा आणि ब्रह्मवृदाचे मत्रोंच्चार करत मंगलमय वातावरणात श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक उत्सव साजरा झाला. राज्यभिषेक दिनोत्सव समितीच्या माध्यमातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक व शिवजयंती साजरी छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक उत्साहात साजरा-माघ शुध्द सप्तमीच्या मुहूर्तावर तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. राज्याभिषेक दिनोत्सव समिती मार्फत दरवर्षी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली. राजसदरेवर आल्यानंतर राज्याभिषेक सोहळा सुरू करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी, पंचामृत, बेलपर्ण आणि नाण्यांचा अभिषेक संभाजी महाराजांच्या प्रतिमेवर करण्यात आला. राज्याभिषेकाच्या पुर्व संध्येला गडदेवतांना अवाहन करण्यासाठी गोंधळ, जागर करण्यात आला. किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक व शिवजयंती साजरी शिवजयंतीही किल्ले रायगडावर झाली साजरी- छत्रपती संभाजी महाराज यांचा तीथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा तर तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ शिवजयंती एकाच दिवशी आली आहे. राज्याभिषेक सोहळ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत दोन्ही सोहळे पार पडले. या सोहळ्याला मान्यवरांसह शेकडो शिवप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यामुळे किल्ले रायगडावरील वातावरण शिवमय झाले होते.किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक व शिवजयंती साजरी हेही वाचा- विरोधकांचा कोथळा काढून शिवरायांनी स्वराज्य टिकवले, महाराष्ट्रातही तेच होईल- संजय राऊत