ETV Bharat / state

नवी मुंबई पोलिसांची अनाथ मुलांसोबत 'आपुलकीची' धुळवड

author img

By

Published : Mar 21, 2019, 10:24 PM IST

होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करत, चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरत आणि पाण्यामध्ये चिंब होत पनवेलकरांनी मोठ्या उत्साहात धुळवडीचा आनंद लुटला.

Breaking News

पनवेल - होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करत, चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरत आणि पाण्यामध्ये चिंब होत पनवेलकरांनी मोठ्या उत्साहात धुळवडीचा आनंद लुटला. नवी मुंबई पोलिसांनीदेखील पनवेलमधील अनाथ मुलांसोबत 'आपुलकीची होळी' साजरी करत अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी अनाथ आश्रमातील मुलांनी मुक्तपणे रंगांची उधळण केली.

बालग्राम आश्रमात धुलीवंदनानिमित्त आयोजित केलेल्या रंगोत्सवात अनाथ मुले-मुली मनसोक्त न्हाऊन गेले. लाल, हिरवा, पिवळा, निळा रंगाने या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंदाचे इंद्रधनुष्य साकारण्याचा प्रयत्न खांदेश्वर पोलिसांनी केला. या रंगोत्सवात सहभागी झालेले हे चिमुकले पहिल्यांदाच रंगपंचमी खेळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. उत्सवाचा आनंद या मुलांनाही घेता यावा, यासाठी खांदेश्वर पोलिसांनी या अनोख्या धुळवडीचे आयोजन केले होते. यावेळी चिमुकल्यांनी गाणी गाऊन, नृत्य करून उपस्थित सर्व पोलिसांचे मनोरंजन केले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नैसर्गिक सुके रंग लावले.

नवी मुंबई पोलिसांची अनाथ मुलांसोबत धुळवड साजरी

दुर्गुणाचे दहन करून सद्गुणांकडे जाण्याचा संदेश देणारा हा सण आहे. मात्र, आपण या सणाला हजारो लिटर पाण्याचा आणि रंगांचा अपव्यय करतो. त्यामुळे अशी धुळवड साजरी करण्यापेक्षा वंचितांच्या आयुष्यात रंग भरायला हवेत, अशी संकल्पना यावेळी खांदेश्वर पोलिसांनी मांडली. नवी मुंबई पोलिसांनी एकत्र येत ही अनोखी धुळवड साजरी करून अनाथ मुलांच्या आयुष्यात माणुसकीचे रंग भरले.

Intro:पनवेल

होळीच्या शुभेच्छा देत एकमेकांवर विविध रंगांची बरसात करत, चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरत आणि पाण्यामध्ये चिंब होत देशभरासह पनवेलकरांनी मोठ्या उत्साहात धुळवडीचा आनंद लुटला. नवी मुंबई पोलिसांनी देखील पनवेल मधल्या अनाथ मुलांसोबत आपुलकीची होळी साजरी करत या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी अनाथाश्रमातील मुलांनी मुक्तपणे रंगांची उधळण करून धमाल केली.

Body:पनवेलमधील बाल ग्राम आश्रमातील अनाथ मुले-मुली धुलीवंदना निमित्त आयोजित केलेल्या या रंगोत्सवात मनसोक्त न्हाऊन निघाले. लाल, हिरवा, पिवळा, निळा रंगाने या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंदाचे इंद्रधनुष्य साकारण्याचा प्रयत्न खांदेश्वर पोलिसांनी केलाय. या रंगोत्सवात सहभागी झालेले हे चिमुकले पहिल्यांदाच रंगपंचमी खेळत असल्याने त्यांच्यातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. सण-उत्सवांचा आनंद या मुलांनाही घेता यावा याकरिता खांदेश्वर पोलिसांनी या अनोख्या धुळवडीचं आयोजन केलं होतं. नाच गाणी रंग आणि मायेची ओढ यामुळे सर्व मुले हरखून गेले होते. या चिमुकल्यांचा उत्साह इतका शिगेला पोहोचला होता की त्यांनी स्वतः गाणं गाऊन डान्स करून उपस्थित सर्व पोलीसांचे मनोरंजन केलं. तसंच खांदेश्वर पोलिसांनी आश्रमातील या मुलांना नैसर्गिक सुके रंग लावून होळी साजरी केली.

Conclusion:होळी सणाच्या मुख्य उद्देशच आपण विसरतोय दुर्गुणांचे दहन करून सद्गुणांची का जाण्याचा संदेश देणारा हा सण आहे मात्र आपण या सणाला हजारो लिटर पाण्याचा आणि रंगांचा अपव्यय करतो त्यामुळे अशी धुळवड साजरी करण्या पेक्षा वंचितांच्या आयुष्यात रंग भरू अशी संकल्पना यावेळी खांदेश्वर पोलिसांनी मांडली. पोलिसांचा आयुष्य म्हणजे खरं तर रस्त्यावरची लढाई असते पोलिसांना आपल्या कुटुंबीयांसोबत कधीच सण साजरा करायला मिळत नाही मात्र आज नवी मुंबई पोलिसांनी एकत्र येत ही अनोखी धुळवड धुळवड साजरी करून या अनाथ मुलांच्या आयुष्यात माणुसकीचे रंग भरलेत.

-----------
बातमी साठी व्हीडीओ आणि बाईट एफटीपी करीत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.