ETV Bharat / state

Coronavirus : घरात राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे - आप्पासाहेब धर्माधिकारी

author img

By

Published : Mar 30, 2020, 8:00 AM IST

जनतेने आपली जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना गर्दी होणार नाही याची, दक्षता घ्यावी. कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता शासनाकडून वेळोवेळी देणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धर्माधिकारी यांनी केले आहे.

Appasaheb Dharmadhikari
आप्पासाहेब धर्माधिकारी

रायगड - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 1 हजार 24वर पोहोचली आहे. यातील 901 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह स्टेजमध्ये म्हणजेच कोरोना संसर्ग झालेले आहेत. तर 96 जर पूर्णत: बरे झाले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून लॉकडाऊन दरम्यान सर्वांनी घरात राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, आपण सर्वजण मिळून कोरोनवर मात करू, असा विश्वास पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

यावेळी धर्माधिकारी म्हणाले, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासन सर्वतोपरी सूचना नागरिकांना देत आहे. जनतेने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळावी, हात मिळविण्यापेक्षा नमस्कार करा, कोरोना विषयी समाजात भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घ्यावी. आपली जीवनावश्यक वस्तूची खरेदी करताना गर्दी होणार नाही याची, दक्षता घ्यावी. कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता शासनाकडून वेळोवेळी देणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धर्माधिकारी यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.