रायगड (खालापूर)- जिल्ह्यातील कर्जत रेल्वे पुलावर मुरबाड येथुन खोपोलीकडे लोखंडांनी भरुन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पीओ कारने कट मारल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे.
एका स्काॅर्पिओ गाडीने कट मारल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे.तर ट्रक उलटल्यावर ट्रकची समोरची काच फुटल्याने ट्रक चालक बाहेर पडू शकला. दरम्यान स्थानिकांकडून जखमी ट्रक चालकाला मदत करत कर्जत पोलीसांना कळविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कर्जत पोलीस घटनास्थळी पोहचून जखमी ट्रक ड्रायव्हरला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.
हेही वाचा-यावलखेड शेत शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; घातपाताची शक्यता
हेही वाचा-कारच्या धडकेत एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी