ETV Bharat / state

क्रिकेटच्या वादातून डोक्यात घातली बॅट, १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

author img

By

Published : Jan 10, 2021, 2:01 PM IST

पेणमध्ये चक्क क्रिकेटवरून भांडण होऊन एका लहान मुलाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भांडणात एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात बॅट घातली. यात 13 वर्षीय प्रेम दळवी या मुलाचा मृत्यू झाला आहे.

चिमुकल्याचा मृत्यु
चिमुकल्याचा मृत्यु

रायगड - मुलांमध्ये खेळताना वाद होण्याचे प्रकार नेहमी घडतात. मात्र पेणमध्ये चक्क क्रिकेटवरून भांडण होऊन एका लहान मुलाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भांडणात एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात बॅट घातली. यात 13 वर्षीय प्रेम दळवी या मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रेम हा वाकरूळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश दळवी याचा मुलगा आहे. प्रेमचा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
डोक्यात घातली बॅट
पेण शहरातील कुंभार आळी येथील सद्गुरू सोसायटीतील लहान मुले क्रिकेट खेळत होती. काही कारणास्तव या मुलांमध्ये क्रिकेटवरून छोटेखानी वाद झाला. यावेळी एका खेळाडूला राग येऊन त्याने प्रेमच्या डोक्यात बॅट घातली. यात प्रेम रक्तबंबाळ झाला.
घाव वर्मी लागल्याने मृत्यू
मुलांमध्ये झालेल्या वादात प्रेम दळवी हा गंभीर जखमी झाला. ही बाब सोयटीतील नागरिकांना आणि पालकांना कळल्यावर तातडीने प्रेमला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्यात बसलेला वार हा वर्मी लागल्याने प्रेमाचा मृत्यू झाला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. प्रेमचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

हेही वाचा - फार्मर माईंड... रिकाम्या बाटल्या, बांबूचा वापर करत पठ्ठ्यानं शेतात पोहचवलं पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.