पुणे - राज्याचे लक्ष लागून असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणूकीत तावरेंचे सहकार बचाव पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनल अशी लढत होत आहे.
हेही वाचा - 'माझा मान-अपमान आता तुमच्या हाती'
विधानसभा असो नाहीतर लोकसभा, पवार घराणे मागील पन्नास वर्षांपासून केवळ सांगता सभा घेऊन निवडणुका जिकंत आले आहे. मात्र, बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मोठ्या पवारांचे जुने मित्र चंद्रराव तावरे आणि त्यांचे खंदे समर्थक रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना बारामतीकरांनी दीड लाखाहून अधिक मताधिक्यांनी निवडुन दिले. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या केवळ 11 हजार 509 सभासदांची मते मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गेली दोन महिने प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.
हेही वाचा - ..तर बायको मला घरातून हाकलूनचं देईल
गेल्या पन्नास वर्षापासून पवारांचे बारामतीवर एकहाती प्राबल्य आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून या कारखान्यावर शरद पवारांचे जुने मित्र चंद्रराव तावरे यांचे वर्चस्व आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणीत तावरे गटाने एकूण २१ जागांपैकी १५ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला होता. त्यामुळे यंदाच्या कारखान्याच्या निवडणूकीकडे बारामतीसह राज्याचे लक्ष लागले आहे.