पुणे - चार चाकी गाडी आणि टेम्पोतून गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 120 किलो गांजा आणि दोन वाहने असा 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हडपसर परिसरातील टोलनाका येथे पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. समीर हसनाली शेख (वय-37), हिमायतउल्ला मोहम्मद अली शेख (वय-41) आणि अश्विन शिवाजी दानवे (वय-26) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; 120 किलो गांजासह 34 लाखाचा मुद्देमाल जप्त - पुणे गांजा जप्त
मुंबईच्या दिशेने गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी पहाटे चार वाजता हडपसर टोलनाका येथे सापळा रचला होता. त्यानुसार पहाटेच्या सुमारास एका चारचाकी गाडीतून 48 किलो गांजा जप्त केला.

गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक