पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या मारहाणीत एका संशयीत चोराचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघड झाली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत. नेमका चोराचा मृत्यू मारहाणीतच झाला आहे का? हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल, असे भोसरी पोलिसांनी सांगितलंं. संतोष महादू हौसे (वय 38 रा. दिघी) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नागरिकांच्या मारहाणीत संशयित चोरट्याचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात होणार स्पष्ट
पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या मारहाणीत एका संशयित चोराचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास उघड झाली आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात संतोषचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे का? हे समजेल, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली. तर, चोरीच्या उद्देशाने तो घरात गेला होता का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे यांनी दिली.