ETV Bharat / state

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बसचालकावर आली बिगारी काम करण्याची वेळ

author img

By

Published : Nov 13, 2020, 6:29 PM IST

बारामती एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या अशोक जंगले यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसर्गामुळे एसटी बससेवा अद्याप सुरळीत झाली नाही. त्यामुळे जंगले यांना महिन्यातून आठच दिवस कामावर बोलवले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करण्याची वेळ आली आहे.

Pune District News Update
बसचालकावर आली बिगारी काम करण्याची वेळ

बारामती - बारामती एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या अशोक जंगले यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसर्गामुळे एसटी बससेवा अद्याप सुरळीत झाली नाही. त्यामुळे जंगले यांना महिन्यातून आठच दिवस कामावर बोलवले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करण्याची वेळ आली आहे.

अशोक मोतीराम जंगले हे मागील दहा वर्षांपासून बारामती एसटी आगारात चालक म्हणून काम करत आहेत. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील पोकळी गावचे रहिवासी आहेत. मात्र नोकरीनिमित्त ते गेली दहा वर्षांपासून बारामतीत वास्तव्य करीत आहेत. अशोक जंगले हे एसटीत कायमस्वरूपी सेवेत आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतांश एसटी बसेस बंद आहेत. त्यामुळे त्यांना महिन्यातील केवळ आठच दिवस काम असते. या कामातून रोज साडेतीनशे रुपये मिळतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आराधना, आदेश व संदेश ही दोन मुले आहेत. चार माणसांचे कुटुंब सांभाळणे सध्या एसटीच्या पगारात परवडत नाही, म्हणून जेव्हा काम नसेल त्यादिवशी जंगले हे बिगारी काम करतात. या बिगारी कामातून त्यांना चारशे रुपये हजेरी मिळते. कुटुंब जगवण्यासाठी बिगारी काम करण्याची वेळ आल्याचे ते सांगतात.

बसचालकावर आली बिगारी काम करण्याची वेळ

वयस्कर आई-वडिलांना पाठवले गावी

या पगारात परवडत नसल्याने वयस्कर आई-वडिलांना गावाकडे पाठवले आहे. आम्ही एसटी क्वार्टरसमध्ये राहायला होतो. तेव्हा पगारातून पैसे कट व्हायचे. मात्र आता क्वार्टरदेखील खाली करायला लावल्याने, नवीन घर पाहण्यासाठी प्रचंड त्रास झाला. घरभाडे देखील दुप्पट द्यावे लागत आहे, अशी व्यथा जंगले यांनी मांडली.

दहा वर्ष प्रामाणिक काम तरी पण हाल

मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. जंगले यांनी दहा वर्ष तालुक्यातील लोकल, मुंबई , सांगली , धुळे, पुणे, या मार्गांवर चालक म्हणून काम केले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांच्याकडून एकही अपघात झाला नाही. कोरोनाकाळात देखील त्यांनी आपली सेवा दिली. त्यांनी परप्रांतीय नागरिकांना छत्तीसगड व मध्य प्रदेश नेऊन सोडले. आजपर्यंत प्रामाणिक काम केले आहे. मात्र आता दोन महिने पगार नाही, उदरनिर्वाह कसा करणार, हा प्रश्न निर्माण झाल्याने बिगारी काम करत आहे. कोणत्याही कामाला लाजत नाही. माझ्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे रोज धान्य विकत आणावे लागते, असेही यावेळी जंगले यांनी सांगितले.

आर्थिक टंचाईमुळे पत्नीच्या गळ्यातील दागिने विकले

मागील तीन महिन्यांपूर्वी मुलाच्या दवाखान्यासाठी व रोजच्या धान्यासाठी पैशांची गरज होती. मात्र पैसे नसल्याने दागिने विकण्याची वेळ आमच्यावर आली. आम्हाला एसटीच्या ड्युटीचे मेसेज व्हॉट्सअपवर येतात. मात्र मोबाईलमध्ये बॅलेन्स नसल्याने मेसेज मिळत नाहीत, त्यामुळे कामाचा खाडा होतो, अशी व्यथा या बसचालकाने मांडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.