ETV Bharat / state

खारफुटीच्या बुरशीचा उपयोग करून प्लास्टिकचे विघटन, पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. अविनाश आडे आणि डॉ. मनीषा सांगळे यांनी गेली 6 वर्ष अथक परिश्रम करून हे यश संपादन केले आहे. यासंदर्भात अविनाश आडे म्हणाले की, नैसर्गिक पद्धतीने प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार वर्षांपर्यंतचा कालावधी अपेक्षित असतो. मात्र, या प्रकल्पामध्ये आम्ही बुरशीचा उपयोग करून हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

author img

By

Published : May 11, 2019, 7:52 PM IST

पुणे - अनेक वर्षांपासून जगभरात प्रदूषणाला कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. मात्र, पश्चिम भारतात आढळणाऱ्या खारफुटीच्या मुळावरील बुरशीचा उपयोग करून प्लास्टिकचे विघटन करण्यात पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश मिळाले आहे.

खारफुटीच्या बुरशीचा उपयोग करून प्लास्टिकचे विघटन, पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. अविनाश आडे आणि डॉ. मनीषा सांगळे यांनी गेली 6 वर्ष अथक परिश्रम करून हे यश संपादन केले आहे. यासंदर्भात अविनाश आडे म्हणाले की, नैसर्गिक पद्धतीने प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार वर्षांपर्यंतचा कालावधी अपेक्षित असतो. मात्र, या प्रकल्पामध्ये आम्ही बुरशीचा उपयोग करून हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर निश्चित करण्यात आलेल्या 12 ठिकाणांहून खारफुटीच्या मुळावरील बुरशीचे 109 नमुने गोळा करण्यात आले होते. त्याचा उपयोग प्लास्टिकच्या विघटनासाठी करण्यात आला आहे. याद्वारे प्रायोगिक तत्त्वावर 2 महिन्यांमध्ये प्लास्टिकचे वजन निम्म्याने कमी करून प्लास्टिकची क्षमता आणि त्यातील घटकांचे उपद्रव मूल्य कमी करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात प्लास्टिकचे पूर्णपणे विघटन करणे शक्य होईल, अशी आमची अपेक्षा आहे.

या प्रयोगामुळे निर्माण होणाऱ्या घटक पदार्थांमुळे प्राणी आणि वनस्पतींना कोणतीही हानी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, शास्त्रशुद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी आणखी काही प्रयोग आणि चाचण्या करण्यात येत असल्याचेही डॉ अविनाश आडे यांनी सांगितले.

डॉ मनीषा सांगळे म्हणाल्या की, हा प्रयोग करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन तेथील माती आणि पाण्याचे नमुने गोळा करणे हे आव्हानात्मक काम होते. यासाठी आम्ही गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरून हे नमुने गोळा केले होते. त्याप्रमाणेच विविध ठिकाणी गोळा केलेल्या नमुन्यांवर प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरण तयार करून प्रयोग करताना प्रत्येक वेळी त्यांचे गुणधर्म तपासावे लागत होते. मात्र, बुरशीद्वारे प्लास्टिकचे विघटन करण्याची पद्धती विकसित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. यासंदर्भात 2 शोधनिबंधही प्रकाशित झाल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

Intro:पुणे - गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात प्रदूषणाला कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. मात्र, पश्चिम भारतात आढळणाऱ्या खारफुटीच्या मुळावरील बुरशीचा उपयोग करून प्लास्टिकचे विघटन करण्यात पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश मिळाले आहे.

Body:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. अविनाश आडे आणि डॉ. मनीषा सांगळे यांनी गेली 6 वर्ष अथक परिश्रम करून हे यश संपादन केले आहे.

यासंदर्भात अविनाश आडे म्हणाले की, नैसर्गिक पद्धतीने प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार वर्षांपर्यंतचा कालावधी अपेक्षित असतो. मात्र, या प्रकल्पामध्ये आम्ही बुरशीचा उपयोग करून हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर निश्चित करण्यात आलेल्या 12 ठिकाणांहून खारफुटीच्या मुळावरील बुरशीचे 109 नमुने गोळा करण्यात आले होते. त्याचा उपयोग प्लास्टिकच्या विघटनासाठी करण्यात आला आहे. याद्वारे प्रायोगिक तत्त्वावर 2 महिन्यांमध्ये प्लास्टिकचे वजन निम्म्याने कमी करून प्लास्टिकची क्षमता आणि त्यातील घटकांचे उपद्रव मूल्य कमी करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात प्लास्टिकचे पूर्णपणे विघटन करणे शक्य होईल, अशी आमची अपेक्षा आहे.

त्याप्रमाणेच या प्रयोगामुळे निर्माण होणाऱ्या घटक पदार्थांमुळे ही प्राणी आणि वनस्पतींना कोणतीही हानी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, शास्त्रशुद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी आणखी काही प्रयोग आणि चाचण्या करण्यात येत असल्याचेही डॉ अविनाश आडे यांनी सांगितले आहे.

डॉ मनीषा सांगळे म्हणाल्या की, हा प्रयोग करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन तेथील माती आणि पाण्याचे नमुने गोळा करणे हे आव्हानात्मक काम होते. यासाठी आम्ही गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरून हे नमुने गोळा केले होते. त्याप्रमाणेच विविध ठिकाणी गोळा केलेल्या नमुन्यांवर प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरण तयार करून प्रयोग करताना प्रत्येक वेळी त्यांचे गुणधर्म तपासावे लागत होते. मात्र, बुरशीद्वारे प्लास्टिकचे विघटन करण्याची पद्धती विकसित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. यासंदर्भात 2 शोधनिबंधही प्रकाशित झाल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.