ETV Bharat / state

पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने एकावर चाकूहल्ला, पतीला अटक

author img

By

Published : Oct 30, 2020, 5:56 PM IST

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

one-was-stabbed-for-using-abusive-language-about-his-wife-in-baramati
पत्नी बाबत अपशब्द वापरल्याने एकावर चाकूहल्ला

बारामती - पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून आरोपीने एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र पोपट खोमणे (45, रा.लोणीभापकर ता.बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तात्या नामदेव मदने असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

मनोज मदने व त्यांचा भाऊ तात्या मदने आणि राजेंद्र खोमणे हे विकास मदने यांच्या बियर शॉपीजवळ बोलत बसले होते. तात्या मदने याने राजेंद्र खोमणे यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले. याचा राग मनात धरून राजेंद्र खोमणे याने तात्या मदने याच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तात्या नामदेव मदने या हल्यात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.