ETV Bharat / state

परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर काही थांबेना...

author img

By

Published : May 21, 2020, 4:25 PM IST

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अनेक कंपन्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील एमआयडीसी आणि इतर उद्योगधंदे हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहेत. परंतू, असे असले तरी परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर थांबताना दिसत नाही.

Pune
परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर काही थांबेना...

पुणे - लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अनेक कंपन्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील एमआयडीसी आणि इतर उद्योगधंदे हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहेत. परंतू, असे असले तरी परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर थांबताना दिसत नाही. या कामगारांनी परत जाऊ नये, राज्यातच थांबावे यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात या कामगारांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र उभारली आहेत. असे असतानाही अनेक कामगार आपापल्या राज्यात जाण्यावर ठाम आहेत.

परप्रांतीय कामगारांशी ईटीव्ही भारतने केलेली बातचीत..
गावी जाणाऱ्या कामगारांसाठी प्रशासनाच्यावतीने गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाल्यानंतर या कामगारांना रेल्वेने गावी पाठवले जात आहे. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या आवारात बिहारच्या कामगारांनी गावी जाण्यासाटी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कोंढवा पोलीस या कामगारांची नोंदणी करून त्यांना पीएमपी बसमधून रेल्वे स्टेशनवर नेऊन सोडतात. त्यानंतर हे कामगार रेल्वेने आपापल्या गावी रवाना होतात. या कामगारांशी ईटीव्ही भारतने केलेली बातचीत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.