ETV Bharat / state

येणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून येणार - प्रशांत जगताप

author img

By

Published : May 8, 2021, 3:46 PM IST

पुणे शहरात पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारची एकहाती सत्ता येईल आणि पुणे शहरात जास्तीत जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

Pune Municipal Election Prashant Jagtap Reaction
आघाडी सरकार सत्ता पुणे प्रशात जगताप प्रतिक्रिया

पुणे - पुणे शहरात पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारची एकहाती सत्ता येईल आणि पुणे शहरात जास्तीत जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

हेही वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार नेमकी कुणाच्या हाती पक्षाची धुरा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर माजी महापौर प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. जगताप यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली.

पुणे महापालिकेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीला आत्ता फक्त अवघे 9 महिने राहिले आहे. भाजपने सव्वाचार वर्षात पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसले. सुसूत्रता नसलेली महापालिका, कोणतेही नियोजन नसलेली महापालिका, असे चित्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तयार करून ठेवली आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत पुणेकर आमच्यावर विश्वास दाखवणार आहे. आणि पुणे महापालिकेत आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार, असा विश्वास यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

कोविड काळात भाजपची कामगिरी असमाधानकारक

केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून पुण्यात 100 नगरसेवक, 6 आमदार, 1 खासदार, 1 मंत्री असून देखील पुण्यात भाजपला चांगल्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था उभारती आलेली नाही. त्याच पद्धतीने रुग्णालय आणि त्यातील व्यवस्था उभी करण्यात भाजपला अपयश आले आहे. काहीही झाले तर फक्त राज्य सरकारला नाव ठेवायची ही मनोवृत्ती भाजपवाल्यांची झाली आहे, अशी टीकाही प्रशांत जगताप यांनी केली.

हेही वाचा- शिरूर शहरातील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद, 5 साथीदारांच्याही आवळल्या मुसक्या

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.