ETV Bharat / state

पिंपरीत पिस्तूलच्या धाकावर तरुणीचे अपहरण; सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या

author img

By

Published : Jan 20, 2021, 5:19 PM IST

पिंपरी-चिंचवड शहरात भर दिवसा प्रेम प्रकरणातून पिस्तूलचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकून तरुणीची सुखरूप सुटका केली आहे.

kidnapping Pimpri Chinchwad
तरुणी अपहरण पिस्तुल धाक

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात भर दिवसा प्रेम प्रकरणातून पिस्तूलचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकून तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. ही घटना काल सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याद्वारे पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. शंतनू चिंचवडे (वय २५) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे

हेही वाचा - ४ ते ११ मार्च दरम्यान १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

अशा प्रकारे तरुणीचे झाले अपहरण....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती, तेव्हा आरोपी शंतनू ऑफिसमध्ये आला आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्याने तरुणीचे अपहरण केले. दरम्यान, ऑफिसमधील कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तरुणीच्या वडिलांनी तात्काळ चिंचवड पोलिसात जाऊन घटनेची माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध लावत तळेगाव दाभाडे येथून आरोपीला अटक केली.

आरोपीची तरुणीशी होती मैत्री

आरोपी शंतनू आणि अपहरण करण्यात आलेली तरुणी हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी होते. त्यांची चांगली मैत्री होती. मात्र, आरोपी हा लग्नासाठी तरुणीकडे तगादा लावत होता. हे तरुणीला आवडत नसल्याने तिने नकार दिला होता, ती तरुणाला भेटत नव्हती. अखेर याचा राग मनात धरून तरुणाने काल सकाळी साडेअकराच्या सुमारास संबंधित तरुणी काम करत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन तरुणीचे अपहरण केले. परंतु, पोलिसांनी आरोपीचा शोध लावून तरुणीची सुखरूप सुटका केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा - पुण्यात रक्ताच्या थारोळ्यात सापडला सराईत गुन्हेगाराचा मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.