पुणे - आज जगात मोठ्या प्रमाणात संशोधन तसेच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तसेच सध्या विविध रुग्णालयात उपचार करत असलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया तसेच विविध कामांसाठी देखील थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर होतो. यासाठी पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT World Peace University) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून मोफत थ्रीडी तंत्रज्ञान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. (3D technology camp by MIT World Peace University). या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील शंभरहून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञान वापराचा लाभ घेतला आहे. (free 3D technology camp)
जगात वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे - वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा नवनवीन तंत्रज्ञानाचा फारसा संबंध येत नाही. त्यांना दिलेल्या अभ्यासक्रमच हे विद्यार्थी शिकत असतात. सध्या जगात वैद्यकीय क्षेत्रात देखील नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया किंवा विविध उपचार पद्धती हे आता खूप सोयीस्कर झाले आहे. यामुळेच एमआयटी विद्यापीठाच्या वतीने मोफत सात दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात विद्यार्थ्यांना थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर तसेच शस्त्रक्रिया करताना किंवा शरीराचे विविध अवयवा बाबत तांत्रिक पद्धतीने माहिती जेणेकरून योग्य उपचार आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांना तसेच डॉक्टरांना उपलब्ध होत आहे.
तंत्रज्ञानाची डॉक्टरांना मोठी मदत - थ्रीडी तंत्रज्ञान आता अभियांत्रिकी क्षेत्राबरोबर वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. पूर्वी एखादी शस्त्रक्रिया किंवा शरीरातील एखाद्या अवयव बदला बाबत बँकेतील अवयव घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते वापरल जात होतं. पण आता असे न होता आता थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर केला की त्या शस्त्रक्रिया आणि त्या अवयव बाबत एक्युरेट माहिती मिळते. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि वेळेची देखील बचत होते. यामुळे आम्ही हे शिबिर सुरू केलं असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपारमेंट चे प्रमुख डॉ. गणेश काकांडिकर यांनी दिली. आतापर्यंत या शिबिरात देशभरातील विविध राज्यातून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात देखील या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास डॉक्टरांना मोठी मदत होणार आहे.