ETV Bharat / state

Ban on bike taxi app : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरदेखील रिक्षा संघटना आक्रमक; 12 डिसेंबरपासून करणार बंद

author img

By

Published : Dec 9, 2022, 2:13 PM IST

बाईक टॅक्सी ॲपवर बंदी ( Ban on bike taxi app ) घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा ( Follow up with Home and Transport Department ) करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख ( Collector Rajesh Deshmukh ) यांनी नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे.

Ban on bike taxi app
आवाहनानंतर देखील रिक्षा संघटना आक्रमक

पुणे : राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी ( Ban on bike taxi app ) घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा ( Follow up with Home and Transport Department ) करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख ( Collector Rajesh Deshmukh ) यांनी केले आहे. या आवाहननंतर रिक्षा संघटनांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना तीन प्रती आवहन केले आहे. पण एकूणच रिक्षा संघटनांच्या प्रती आवहान पाहता येत्या सोमवार पासून पुन्हा 12 डिसेंबर पासून रिक्षा चालक हे आंदोलन करणार आहे.

रिक्षा संघटनकडून प्रती आवाहने : जिल्हाधिकारी यांनी वृत्तनिवेदन काढून बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीला 12 डिसेंबर 22 रोजी आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. त्याचा आदर राखून तसेच लालफितीच्या कारभारामुळे समितीचे कामकाज होण्यास होणारी दिरंगाई समजावून घेऊन आम्ही मजिल्हाधिकारी साहेबांना असे प्रति अवाहान करतो. सर्व रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना बेकायदा बाईक टॅक्सी बंद होईपर्यंत रेशन पुरवण्यात यावे. जे जे रिक्षाचालक घराची भाडी भरू शकणार नाहीत त्यांना राहण्यासाठी प्रशासनाने निर्वासितां प्रमाणे छावण्या सुरू कराव्यात. सर्व शाळांना तंबी द्यावी की, फी भरण्यास, कपडे व पुस्तके खरेदी करण्यास रिक्षाचालकांच्या मुलांना बाईक टॅक्सी बंद होइपर्यंत सूट द्यावी अस प्रती आवाहन यावेळी रिक्षा संघटनकडून करण्यात आले आहे.

आवाहनानंतर देखील रिक्षा संघटना आक्रमक

बाईक टॅक्सी ॲपवर कारवाई : रिक्षा चालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गठीत समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपआयुक्त, पोलीस उपआयुक्त , पोलीस उपआयुक्त आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने 7 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागातर्फेदेखील विशेष मोहीम : जिल्हा प्रशासनाने रिक्षा चालकांच्या न्याय मागण्यांबाबत नेहमीच सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फेदेखील विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदेशिर बाईक टॅक्सी ॲप चालविणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपआयुक्तांमार्फत पाठपुरवा करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता रिक्षा चालकांनी आंदोलन करणे उचित होणार नाही. अशा आंदोलनामुळे नागरिकांची अधिक प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.

रिक्षा चालकांनी आंदोलन करू नये : रिक्षा चालकांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय रिक्षा चालकांच्या समस्यांबाबतही प्रशासन संवेदनशिलतेने निर्णय घेत असते. स्वत: पालकमंत्र्यांनीदेखील त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडेदेखील बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. हे लक्षात घेता रिक्षा चालकांनी आंदोलन करू नये आणि यावेळीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले होते. पण जे प्रति आवाहन रिक्षा संघटन करून करण्यात आलेला आहे हे पाहता येत्या सोमवार पासून पुन्हा शहरात रिक्षा संघटनांकडून बंद पुकारण्यात येणार आहे हे स्पष्ट होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.