ETV Bharat / state

विप्रोकडून पुण्यातील हिंजेवाडी येथे विशेष कोविड-१९ रुग्णालयाची होणार उभारणी

author img

By

Published : May 5, 2020, 7:41 PM IST

विषाणूचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे, तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे. विप्रो महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे.

covid-19 special hospital pune
विप्रो

पुणे - जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा देणारी विप्रो लिमिटेड कंपनीने शहरात विशेष कोविड-१९ रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५० खाटांचे हे रुग्णालय असणार असून कंपनीने यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला आहे. हे विशेष कोविड-१९ रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशनचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कराराच्या निमित्ताने म्हटले आहे. हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल.

गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे कोविड-१९ साठी समर्पित असलेले स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल. आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहायाने रुग्णालय त्वरित सुरू करण्यासाठी विप्रो प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबरोबरच पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करेल.

कोरोना विषाणूविरुद्ध लढताना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे. विषाणूचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे, तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे. विप्रो महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे.

विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनने कोविड-१९ विरुद्ध लढताना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोना विषाणूचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनने मुंबई, पुणे, औरंगाबाद, वाळूज, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड-१९ विषाणूविरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील ३४ लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

हेही वाचा- युवास्पंदन अन् सोशल मोदक संस्थेकडून रिक्षाचालकांना मदतीचा हात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.