ETV Bharat / state

'बिहारच्या निकालाचे सकारात्मक परिणाम होतील; राज्यातील सरकार चार वर्षही टिकणार नाही?'

author img

By

Published : Nov 11, 2020, 4:35 PM IST

Updated : Nov 11, 2020, 5:10 PM IST

बिहारच्या निवडणुकीचे सकारात्मक परिणाम पुढील सर्व निवडणुकांवर दिसून येतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातले सरकार चार वर्षे टिकेल का सांगता येत नाही त्यांच्या कर्मानैच ते पडेल असेही पाटील यावेळी म्हणाले.

chandrkant patil
राज्यातील सरकार चार वर्षच टिकेल?' चंद्रकांत पाटील

पुणे - बिहार निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालात बिहारमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे या निकालाचे पडसाद पुढील सर्व निवडणुकांवर दिसून येतील, असा विश्वास भाजपाचे प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मी या मतदारसंघासाठी अनेक गोष्टी केल्या-

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपची परंपरागत सीट आहे. याठिकाणी भाजपचे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे, युवका संबंधीच्या अनेक संस्था ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना युवकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. पदवीधर आमदार असताना मी अनेक गोष्टी या मतदारसंघासाठी केले आहेत. त्यामुळे संग्राम देशमुख यांच्यासह आमचे तीन पदवीधरचे उमेदवार असे सगळे उमेदवार शिक्षक आणि पदवीधर यांच्या प्रश्नावर भांडतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

राज्यातील सरकार चार वर्षही टिकणार नाही?'

मनाचीही भूक भागली पाहिजे-

बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना या निवडणुकीचा सकारात्मक परिणाम पुढील सर्वच निवडणुकांवर होईल, असा दावा त्यांनी व्यक्त केला. राज्यांमध्ये प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत बोलताना लोकांची मनाची भूक भागली पाहिजे, मंदिर, मशीद, चर्च अशी सर्वच प्रार्थनास्थळे उघडली पाहिजेत. पोटाची भूक असते, तशी मनाची भूक भागविली पाहिजे. त्यामुळे सरकारने मंदिर प्रार्थनास्थळे सुरू केली पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

आता निवडणूक घ्या भाजप निवडणूक येईल-

राज्यातील आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना आता जर पुन्हा निवडणूक घेतली. तर भाजप राज्यात सत्तेवर येईल, असा दावा करत कामगार विद्यार्थी शेतकरी महिला अशा 1000 लोकांचा सर्वे करा. त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील. त्यामुळे आता निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा दावा त्यांनी केला.

सरकार पाडणार नाही, ते पडेल-

आम्ही चार वर्षे विरोधात बसू पण चार वर्ष हे सरकार चालले तर पाहिजे असे पाटील म्हणाले, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे. मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, चालणार नाही म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे. त्यावर भाष्य करायला मी काही भविष्यकार नाही. जनता या सरकारला त्रासली आहे, तेच सरकार बदलवतील, आम्ही घटनेच्या बाहेरून काही करणार नाही. सरकार पाडणार नाही ते त्यांच्या अंतर्गत वादातून पडेल, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार संदर्भात बोलताना हाथरस याठिकाणी राहुल गांधी गेले होते. आता ते पारोळा येथे येतील का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

Last Updated : Nov 11, 2020, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.