ETV Bharat / state

शरद पवारांचा डॉ नरेंद्र दाभोलकर करू, अशी धमकी आल्यानंतर दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेची पुन्हा चर्चा

author img

By

Published : Jun 9, 2023, 5:34 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा डॉ नरेंद्र दाभोलकर करू, अशी धमकी ट्विटरवरुन देण्यात आली आहे. त्यानंतर दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात मॉर्निंग वॉकला गेले असताना दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी देणाऱ्याने पवारांचा नरेंद्र दाभोलकर करु अशा आशयाची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पुन्हा दाभोलकर यांच्या हत्येबाबत चर्चा होताना दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 साली करण्यात आली होती. या घटनेने सर्व पुणे तसेच अंद्धश्रद्धा निर्मुलनासाठी काम करणारे सर्वचजण हादरले होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. डॉक्टर दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची हत्या झाली होती. या घटनेला 10 वर्ष होऊनही याचा तपास अजूनही सुरू आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्याबाबतीत सुनावणी ही आत्ता पुण्यातील शिवाजीनगर येथील कोर्टात होत आहे.आत्तापर्यंत या प्रकरणात 25 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष ही घेण्यात आली आहे. लवकरच याचा निकाल देखील लागण्याची शक्यता आहे.

29 ऑगस्ट 2013 या दिवशी जेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली तेव्हा त्यादिवशी झाले असे की संभाजीनगर (पूर्वीचं औरंगाबाद) येथून डॉ. दाभोळकर यांचे मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे पुण्यात आले. त्यांनी डॉ. दाभोळकर हे ज्या इमारतीत राहायला होते तिथे पाहणी केली. त्यांनतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालय असलेल्या साधना मीडिया सेंटर इथे देखील त्यांनी पाहणी केली. जेव्हा पहाटेच्या सुमारास दाभोलकर हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि ते पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. तेव्हा त्यांच्यावर गोळ्या मारून त्यांची हत्या करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आत्तापर्यंत सचिन अंदुरे, शरद कळसकर, विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणी आत्ता पर्यंत 25 जणांची साक्ष घेण्यात आली आहे.आणि लवकरच याबाबत निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा..

Sharad Pawar death threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...काही घडले तर गृहमंत्रालय जबाबदार-सुप्रिया सुळे

Sharad Pawar Threat Case: शरद पवारांना धमकी देणाऱ्यास अटक करून मास्टरमाईंड शोधा - अजित पवार

Sharad Pawar : जिवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.