ETV Bharat / state

परभणीत ३० केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

परभणी लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ याप्रमाणे ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार, असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

परभणीत ३० केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार
author img

By

Published : Apr 30, 2019, 9:17 PM IST

परभणी - परभणी लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ याप्रमाणे ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार, असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. यावेळी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर झाला आहे. या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची मोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष होणार असल्याने याविषयी उत्सुकता लागली आहे.

परभणीत ३० केंद्रांमधील व्हीव्हीपॅटची मोजणी होणार

परभणी लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात आली होती. मतदानंतर या मशीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्ट्राँगरुमला पहारा देण्यात येत आहे. दरम्यान, प्रत्येक मतदाराला मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर कोणाला मतदान केले, याची चिठ्ठी ७ सेकंदापर्यंत पाहता आली. त्यानंतर ही चिठ्ठी मशीनला जोडलेल्या ट्रेमध्ये जमा झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रणा कार्यान्वित होती.

व्हीव्हीपॅट मोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र काढले आहे. त्यानुसार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे मतदान केंद्र रँडम पद्धतीने निवड करण्यात येणार आहेत. ईव्हीएम मशीनचे मतदान मोजणी झाल्यानंतर निवडलेल्या ५ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार अूसन, त्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या मतदानाशी पडताळणी केली जाणार आहे.

Intro:परभणी - परभणी लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ या प्रमाणे ३० केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. दरम्यान, यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर झाला असून, या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची मोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष होणार असल्याने याविषयी उत्सुकता लागली आहे.
Body:परभणी लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथम ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात आली होती. मतदानंतर या मशीन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्ट्रॉंग रुम तयार करून त्यावर कडा पहारा देण्यात येत आहे. दरम्यान, प्रत्येक मतदाराला मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर कोणाला मतदान केले, याची चिठ्ठी ७ सेकंदापर्यंत पाहता आली. त्यानंतर ही चिठ्ठी मशीनला जोडलेल्या ट्रेमध्ये जमा झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रणा कार्यान्वित होती. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता मतमोजणीचे वेध लागले आहेत. २३ मे रोजी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी दरम्यान व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होणार का? होत असेल तर ती कशी होणार? या विषयी उमेदवारांसह मतदारांनाही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, व्हीव्हीपॅट मोजणी संदर्भात निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र काढले असून, त्यानुसार लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे मतदान केंद्र रँडम पद्धतीने निवड करावयाचे आहेत. ईव्हीएम मशीनचे मतदान मोजणी झाल्यानंतर निवडलेल्या ५ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार अूसन, त्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या मतदानाशी पडताळणी केली जाणार आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- Note :- बातमीसाठी मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम चे vis web mojo वर पाठवले आहेत.
Slug/Title :- parbhani_strong_room_vis_1
&
parbhani_strong_room_vis_2Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.