ETV Bharat / state

बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखांची रोकड लंपास, सेलुमधील घटना - बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखांची रोकड लंपास

कर्मचारी सोमवारी सकाळी सेलू येथील बँकेच्या शाखेतून दुचाकीने बँकेची रोकड घेऊन जात होते. रोखपाल पवन फुलमाळी हे दुचाकी चालवत होते. याचवेळी अचानक दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी या बँक कर्मचार्‍यांच्या दुचाकीस धडक देऊन गाडी थांबविली

बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून  2 लाखाची रोकड पळवली
बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखाची रोकड पळवली
author img

By

Published : Dec 31, 2019, 4:27 AM IST

परभणी - सेलू येथील मध्यवर्ती सहकारी बँकेची रोकड घेऊन जात असताना दुचाकीस धडक देत चोरट्यांनी बँक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 2 लाखाची रोकड लंपास केली. देऊळगाव गात ते डासाळा रस्त्यादरम्यान ही घटना घडली.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेलू तालुक्यातील डासाळा येथे शाखा आहे. या शाखेत बँक शाखाधिकारी के.एन.मांडे तर रोखपाल म्हणून पवन फुलमाळी हे कार्यरत आहेत. सदर कर्मचारी सोमवारी सकाळी सेलू येथील बँकेच्या शाखेतून दुचाकीने बँकेची रोकड घेऊन जात होते. रोखपाल पवन फुलमाळी हे दुचाकी चालवत होते.

याचवेळी अचानक दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी या बँक कर्मचार्‍यांच्या दुचाकीस धडक देऊन गाडी थांबविली. त्यातच पवन फुलमाळीच्या डोळ्यात मिरचीपुड टाकत मारहाण केली. तसेच रोकड घेऊन पाठीमागे बसलेले शाखाधिकारी के. एन. मांडे यांना या चोरट्यांनी दगड, काठ्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील बँकेची सुमारे दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान, या घटनेत सदर बँक कर्मचार्‍यांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत तपास सुरु केला आहे.

Intro:परभणी - सेलु येथील मध्यवर्ती सहकारी बँकेची रोकड घेवुन जात असतांना दुचाकीस धडक देवुन डोळ्यात मिरची पुड टाकुन मारहाण करत बँकेची रोकड लंपास केल्याची घटना (सोमवारी) देऊळगाव गात ते डासाळा रस्त्यादरम्यान घडली.Body:परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेलू तालुक्यातील डासाळा येथे शाखा आहे. या शाखेत बँक शाखाधिकारी के.एन.मांडे तर रोखपाल म्हणुन पवन फुलमाळी हे कार्यरत आहेत. सदर कर्मचारी सोमवारी सकाळी सेलु येथील बँकेच्या शाखेतून दुचाकीने बँकेची रोकड घेवुन जात होते. रोखपाल पवन फुलमाळी हे दुचाकी चालवत होते. याचवेळी अचानक दोन दुचाकीवरुन आलेल्या चाैघांनी या बँक कर्मचार्‍यांच्या दुचाकीस धडक देऊन गाडी थांबविली. त्यातच पवन फुलमाळीच्या डोळ्यात मिरचीपुड टाकत मारहाण केली. तसेच रोकड घेवुन पाठीमागे बसलेले शाखाधिकारी के. एन. मांडे यांना या चोरट्यांनी दगड, काठ्यांनी मारहाण करत त्याच्याकडील बँकेची रोकड सुमारे दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, या घटनेत सदर बँक कर्मचार्‍यांनाही गंभीर दुखापत झाली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीसांनी भेट देत घटनेची पाहणी केली.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- Pbn_selu_police_station_photoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.