ETV Bharat / state

परभणीत सैन्य भरती; पाच दिवसात 28 हजार उमेदवारांची चाचणी

भरतीसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून, त्यापैकी पाच दिवसात 35 हजार उमेदवार येणे अपेक्षित होते. मात्र 7 हजार जणांनी दांडी मारल्याने 28 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन शारीरिक आरोग्य चाचणी दिली आहे.

process for recruitment of army personnel is started in Parbhani city
परभणी शहरात सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू
author img

By

Published : Jan 9, 2020, 4:38 PM IST

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर देशाच्या सैन्य दलात भरती होण्यासाठी उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना संधी दिली जात आहे. यामध्ये गेल्या पाच दिवसात 35 हजार पैकी 28 हजार उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या पार पडल्या आहेत. भरती प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आलेले कर्नल विजय पिंगळे यांनी याबाबतची माहिती दिली.

परभणी शहरात देशाच्या सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू

हेही वाचा... 'सीएएवरून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करा' म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयानं दिलं 'हे' उत्तर

या सैन्य भरती प्रक्रियेला 4 जानेवारीला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये आतापर्यंत परभणी, बुलढाणा, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांच्या आरोग्य तसेच शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. तर पुढील दिवसांमध्ये जळगाव, नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यातील उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा... मुंबई शेअर बाजारात ५०० अंशाची उसळी : मध्यपूर्वेतीत तणाव कमी होण्याच्या शक्यतेचा परिणाम

दरम्यान, या भरतीसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून, त्यापैकी पाच दिवसात 35 हजार उमेदवार येणे अपेक्षित होते. मात्र 7 हजार जणांनी दांडी मारल्याने 28 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन शारीरिक आरोग्य चाचणी दिली आहे. यापैकी निवड झालेल्या मुलांना पुढील आरोग्य तपासणीसाठी औरंगाबाद तसेच पुणे येथील सैन्य दलाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची 23 फेब्रुवारीला औरंगाबाद येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत हजारोच्या संख्येत उमेदवार सैन्यदलात भरती होतील, अशी माहिती सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी दिली.

हेही वाचा... लक्ष्मी अग्रवालच्या वकिलांचीही 'छपाक' विरोधात न्यायालयात धाव, वाचा काय आहे प्रकरण

दरम्यान, 4 ते 7 जानेवारीपर्यंत नियमित चाललेल्या या भरतीप्रक्रियेत 8 जानेवारीला सुट्टी घेण्यात आली होती. त्यानंतर आज 9 जानेवारीला या भरती प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी पुणे येथून वरिष्ठ कर्नल विजय पिंगळे आले होते. यांनी सर्व भरती प्रक्रियेची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा यात झालेल्या चाचण्या आणि त्यांच्या उमेदवारांची संख्या सांगून भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होत नाही. शहरातील रहदारीत भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांचा कोणताही त्रास होऊ नये, म्हणून या उपाययोजना केलेल्या असतात. तसेच सकाळी देखील आठ वाजेच्या आत मुलांची तपासणी होऊन ते आपापल्या गावी परततात. त्यामुळे शहर जागे व्हायच्या आधी भरती प्रक्रिया होत असते, असेही पिंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा... धक्कादायक...! नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून

विशेष म्हणजे मैदानाजवळ सामाजिक संघटनांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच शहरात विष्णू जिनिंग या ठिकाणी सुद्धा या उमेदवारांना निवास आणि जेवण दिले जात असून, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या इमारतीत देखील उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Intro:परभणी - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर देशाच्या सैन्य दलात भरती होण्यासाठी उमेदवारांची चाचणी घेतल्या जात आहे. यामध्ये मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना संधी दिल्या जात आहे. यामध्ये गेल्या पाच दिवसात 35 हजार पैकी 28 हजार उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या पार पडल्या असल्याची माहिती पुणे येथून आज भरती प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आलेल्या कर्नल विजय पिंगळे यांनी दिली.Body:सदर सैन्य भरती प्रक्रिया प्रक्रियेला 4 जानेवारी रोजी सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया 13 जानेवारी पर्यंत चालणार आहे. यामध्ये आतापर्यंत परभणी, बुलढाणा, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांच्या आरोग्य तसेच शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. तर पुढील दिवसांमध्ये जळगाव, नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यातील उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून, त्यापैकी पाच दिवसात 35 हजार उमेदवार येणे अपेक्षित होते. मात्र 7 हजार जणांनी दांडी मारल्याने 28 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन शारीरिक आरोग्य चाचणी दिली आहे. यापैकी निवड झालेल्या मुलांना पुढील आरोग्य तपासणीसाठी औरंगाबाद तसेच पुणे येथील सैन्य दलाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची 23 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत हजारोच्या संख्येत उमेदवार सैन्यदलात भरती होतील, अशी माहिती सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी दिली.
दरम्यान, 4 ते 7 जानेवारीपर्यंत नियमित चाललेल्या या भरतीप्रक्रियेत काल 8 जानेवारी रोजी सुट्टी घेण्यात आली होती. त्यानंतर आज 9 जानेवारी रोजी या भरती प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी पुणे येथून वरिष्ठ कर्नल विजय पिंगळे आले होते. यांनी सर्व भरती प्रक्रिय ची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा यात झालेल्या चाचण्या आणि त्यांच्या उमेदवारांची संख्या सांगून त्यांनी भरती प्रक्रिया रात्री का राबविल्या जाते, याचीही माहिती दिली. रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांना कुठलाही त्रास होत नाही. शहरातील रहदारीला भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांचा कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून या उपाययोजना केलेल्या असतात. तसेच सकाळी देखील आठ वाजेच्या आत मुलांची तपासणी होऊन ते आपापल्या गावी परततात. त्यामुळे शहर जागे व्हायच्या आधी आमची भरती प्रक्रिया होत असते, असेही पिंगळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे भरती मैदानाजवळ सामाजिक संघटनांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच शहरात विष्णू जिनिंग या ठिकाणी सुद्धा या उमेदवारांना निवास आणि जेवण दिल्या जात असून, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या इमारतीत देखील उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_militry_recruitment_carnal_byte_vis_byte_pkgConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.