ETV Bharat / state

'लॉकडाऊन'मध्ये परभणीत दारूची अवैध विक्री

author img

By

Published : May 13, 2021, 6:59 PM IST

अवैधरित्या विक्री करण्यासाठी दारूचा साठा घेऊन जाणार्‍या दोघांना सेलू पोलिसांनी पकडले आहे. तसेच दारूची अवैध विक्री करणाऱ्याग एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परभणी दारू
परभणी दारू

परभणी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आल आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद आहे. याचाच गैरफायदा घेऊन जिल्ह्यातील अनेक भागात अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. त्यानुसार अवैधरित्या विक्री करण्यासाठी दारूचा साठा घेऊन जाणार्‍या दोघांना सेलू पोलिसांनी पकडले आहे. तसेच दारूची अवैध विक्री करणाऱ्याग एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून दारू साठ्यासह 4 लाख 99 हजार 110 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा रचून कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटतीर्थवाले, पोलीस नाईक रामेश्वर मुंडे, विलास सातपुते यांच्या पथकाने केली. पथकाला मिळलेल्या माहितीनुसार दोन जण टाटा झेस्ट कार (एमएच 22 यू 6564)मधून अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन मंठा रोडने रायगड कॉर्नरकडून सेलू शहरात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. त्याप्रमाणे सेलूच्या रेल्वे गेटपासून तहसीलकडे जाणार्‍या रोडच्या कोपऱ्यावर पकडलेल्या कारमध्ये प्रमोद राधेश्याम पोरवाल (वय 49, रा. शिक्षक कॉलनी, पाथरी) आणि विष्णू माणिकराव सोळंके (वय 39, रा. गंगामसला, ता. माजलगाव) हे सापडले. पोलिसांनी ती कार अडवून झडती घेतली.

विदेशी मद्याचा साठा आढळला

सदर कारमध्ये मॅकडॉवेल नंबर 1 कंपनीचे दहा बॉक्स, विदेशी दारूचे 480 बॉटल (किंमत 76 हजार 809 रुपये) तसेच इंपिरियल ब्लू कंपनीचे 48 बॉटल (किंमत 7 हजार 290) तर बडवायजर किंग ऑफ बीअर्सचे 24 बॉटल (किंमत 4 हजार 680) तसेच सिलव्हर रंगाची टाटा झेस्ट कार (किंमत 4 लाख रुपये) असा एकूण 4 लाख 88 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींविरुद्ध गाडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू विक्री करणारी महिला ताब्यात

सेलू शहरात बुधवारी सायंकाळी 6वाजता रेखाबाई भगवान काळे (वय 35, रा. वालूर रोड, सेलू) या महिलेकडून मॅकडॉवेल नंबर 1 कंपनीचे विदेशी दारू चे 38 बॉटल (किंमत 6 हजार 80 रुपये) तसेच इंपिरियल ब्लू कंपनीची 29 बॉटल (किमत 4 हजार 350 रुपये) मुद्देमाल असा 10 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी रामेश्वर मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय सुधाकर चौरे आणि थोरवट करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.