ETV Bharat / state

परभणीत युनियन बँकेच्या व्यवस्थापकासह १० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण; कोरोना झाल्याचा संशय

शहरातील वसमत रोडवर युनियन बँक आहे. याठिकाणी व्यवस्थापकासह इतर १० कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, या ठिकाणचे व्यवस्थापक धुळे येथून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. मात्र, धुळे येथे असताना ते दुबईला गेले होते. दुबई दौऱ्यात त्यांचा ज्या मित्राशी संपर्क आला, त्या मित्राला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

corona union bank parbhani
युनियन बँक
author img

By

Published : Mar 21, 2020, 9:15 PM IST

परभणी- शहरातील युनियन बँकेच्या व्यवस्थापकाचा दुबई येथे प्रवासादरम्यान कोरोनाग्रस्त मित्राशी संपर्क झाला होता. त्यानंतर हे व्यवस्थापक शहरात परतले. गेल्या दहा दिवसांपासून ते बँकेत सेवा बजावत होते. ही माहिती समजताच प्रशासनाचे धाबे दणाणले, त्यामुळे तत्काळ व्यवस्थापकासह बँकेच्या १० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

माहिती देताना परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

बँकेतील सर्व संशयित कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून लवकरच त्यांचे अहवाल येणार आहे. त्यानंतर पुढची कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. शहरातील वसमत रोडवर युनियन बँक आहे. याठिकाणी व्यवस्थापकासह इतर १० कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, या ठिकाणचे व्यवस्थापक धुळे येथून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. मात्र, धुळे येथे असताना ते दुबईला गेले होते. दुबई दौऱ्यात त्यांचा ज्या मित्राशी संपर्क आला, त्या मित्राला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या या व्यवस्थापकांना देखील धोका असण्याची शक्यता आहे.

ही बाब समजल्यानंतर प्रशासनाने तत्काळ बँकेत धडक देऊन कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी सातच कर्मचारी आढळून आले. बँकेतील ३ कर्मचारी नांदेडला गेले आहेत. त्यामुळे, नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांना यासंदर्भात कल्पना देऊन ३ कर्मचाऱ्यांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली आहे. शिवाय, शहरातील सातही कर्मचार्‍यांचे आपापल्या घरी विलगीकरण करण्यात आले असून, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

शिवाय, व्यवस्थापकांना धुळे येथे त्यांच्या घरात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे देखील मुगळीकर म्हणाले. तर, या सर्व कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल लवकरच येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले.

३१ पर्यंत बँकेला टाळे

दरम्यान, या प्रकारामुळे युनियन बँक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे, ही बँक आता बंद राहणार असून सर्वांना बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा- परभणी बसस्थानकात 'कोरोना'चे तपासणी केंद्र बेवारसच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.