पालघर- येथील कासा-विक्रमगड महामार्गावर तलवाडा येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- कोरेगाव भीमा प्रकरण: ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून महाविकासआघाडीत ठिणगी
कासा-विक्रमगड मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना एका अज्ञात वाहनाने घडक दिली आहे. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटली नसल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. याप्रकरणी विक्रमगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.